मागील महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केले होते. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या भारतीय संघाला त्यामुळे विश्वचषकातून बाहेर व्हावे लागलेले. त्याचवेळी विश्वचषकासाठीच्या संघात समाविष्ट असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. आता त्यावर स्वतः चहलनेच पुढे येत प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाने विश्वचषकात 6 सामने खेळले. या सहाही सामन्यात युजवेंद्र चहल याला संधी मिळाली नाही. विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया लागलेल्या भारतीय संघातील तो एकमेव असा खेळाडू राहिला ज्याला एकाही सामन्यात निवडले गेले नाही. ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांचा लाभ त्याला होईल अशी अपेक्षा ठेवून त्याची निवड केली गेलेली. मात्र, स्पर्धेदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापनाने व कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल यांच्यावर विश्वास दाखवला. याबाबत बोलताना चहल म्हणाला,
“क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. त्यावेळी अश्विन आणि अक्षर चांगल्या फॉर्ममध्ये होते. ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी देखील तयार होतो. या गोष्टी घडत असतात. रोहित भाई आणि द्रविड यांनी मला याबाबत स्पष्टपणे सांगितले होते.”
चहलला 2021 टी20 विश्वचषकात निवडलेली गेले नव्हते. या विश्वचषकात तो नक्कीच यशस्वी ठरला असता असे अनेक दिग्गजांनी म्हटलेले.
संपूर्ण वर्षभरात चहल हा भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू होता. त्याने या वर्षी भारतीय संघासाठी खेळताना 14 बळी मिळवलेले. तसेच यावर्षीच्या आयपीएलमध्ये देखील त्याने सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप आपल्या नावे केलेली. विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात देखील तोच भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.
(Yuzvendra Chahal Revealed Reason Behind No Chance In T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट
BANvIND: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल