राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२२मध्ये धडाकेबाज प्रदर्शन करतो आहे. त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही दमदार फॉर्ममध्ये आहेत. एकीकडे सलामीवीर जोस बटलर फलंदाजी विभागात दम दाखवतो आहे. तर गोलंदाजी विभागात फिरकीपटू युझवेंद्र चहल चमक दाखवतो आहे. या दोन्ही खेळाडूंमधील संबंधही तितकेच चांगले आहेत. बऱ्याचदा नेट्समध्ये हे खेळाडू एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले आहेत. नुकताच त्यांचा असाच एक व्हिडिओ पुढे आला आहे, ज्यामध्ये चहल बटलरला त्याच्या फलंदाजीवर जळू नकोस असे सांगत आहे.
राजस्थान (Rajasthan Royals) फ्रँचाझीने या दोन्ही खेळाडूंमधील मस्तीचा (Yuzvendra Chahal & Jos Buttler Funny Video) व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, चहल (Yuzvendra Chahal) हातखंडा असलेली गोलंदाजी सोडून फलंदाजीत हात आजमावताना दिसत आहे. तो नेट्समध्ये षटकार न मारू शकल्याने इंग्लंडचा क्रिकेटपटू त्याची पायखेची करत आहे. यावर चहल त्याला प्रत्युत्तर देतो.
चहल बटलरला (Jos Buttler) म्हणतो की, “माझ्या डोक्यावरील कॅमेरामध्ये सर्वकाही कैद झाले आहे. जर माझ्या फलंदाजी करण्याने तुझ्या सलामीच्या स्थानासाठी तुला प्रतिस्पर्धा मिळत असेल, तर तू का जळतोय?” तसेच चहल व्हिडिओ शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यासोबतही मस्ती करताना दिसत आहे.
राजस्थान फ्रँचायझीने या गमतीशीर व्हिडिओला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चहलसोबत नेट्समध्ये जा आणि आपल्या जीवनातील पुढच्या १२१ सेकंदांचा आनंद घ्या.’
Head inside the nets with @yuzi_chahal and enjoy the next 121
seconds of your life. 🤭💗#RoyalsFamily | #HallaBol | #TATAIPL2022 pic.twitter.com/G01N01sEs2— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 13, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
राजस्थान रॉयल्सची आतापर्यंतची कामगिरी
दरम्यान राजस्थानला नुकत्याच (१४ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी ३७ धावांनी हा सामना गमावला आहे. हा त्यांचा हंगामातील दुसरा पराभव आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने हंगामातील १३व्या सामन्यात राजस्थानला पराभूत केले होते. बेंगलोरने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला होता.
असे असले तरीही, ३ विजयांसह राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ६१ धावांनी पराभूत करत हंगामातील पहिला विजय नोंदवला होता. त्यानंतर राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली होती. या ३ विजयांमुळे राजस्थानचा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
GT vs RR | रस्सी वॅन डर ड्यूसेनचा कमाल थ्रो! थेट स्टम्पवर चेंडू फेकत वेडला धाडले माघारी, पाहा Video
हार्दिकने गोलंदाजी करताना का सोडले अचानक मैदान? खरे कारण आले समोर
अखेरच्या भारत दौऱ्यावर पाकिस्तानी क्रिकेटर्ससोबत पत्नींना पाठवण्यामागे होता खास उद्देश, झाला खुलासा