भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान मंगळवारी आपली अभिनेत्री पत्नी सागरिका घाटगे हिच्यासह झारखंडमध्ये आला होता. यावेळी ते दोघेही राजारप्पा येथील प्रसिद्ध आणि पौराणिक माता चिन्नमस्तीक मंदिरात पोहोचले. झहीर आणि सागरिका यांनी प्रार्थना करत देवीचे आशीर्वाद घेतले. दोघांनीही केलेला नवस पूर्ण झाल्यास पुन्हा येण्याचे आश्वासन देखील दिले.
अचानक दिली मंदिरास भेट
क्रिकेटर झहीर खान मंदिरात पोहोचल्याची बातमी ऐकताच त्याचे चाहतेही तिथे पोहोचल्याने, मंदिर परिसरात लोकांची गर्दी जमली. झहीर व सागरिकाने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन यादरम्यान केले. दोघांनीही मंदिरात असताना पुर्ण वेळ मास्क घातला होता. विशेष म्हणजे हे जोडपे कोणालाही न सांगता झारखंडच्या राजरप्पा येथील चिन्नमस्तिके मंदिरात पूजा करण्यासाठी आले होते. झहीरने सपत्नीक मंदिरात सुमारे १५ मिनिटे चिन्नमस्ता देवीची पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. हे सेलिब्रिटी जोडपे आल्याची माहिती मिळताच, मंदिर व्यवस्थापनाकडून सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली.
झहीर म्हणाला, तर आम्ही पुन्हा येऊ
झहीर खान आणि त्यांची पत्नी सागरिका घाटगे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रांचीला आले होते. यावेळी ते दोघेही आईच्या दरबारात पोहोचले. येथे पोचल्यावर झहीर खान म्हणाला की, ‘आई चिन्नमस्तिकेविषयी आम्ही खूप ऐकले होते. पत्नीने इच्छा व्यक्त केली, इकडे आलो आहोत तर, एकदा आई चिन्नमस्तीके मंदिरात जाऊन येऊया. इथे येऊन छान वाटले. आम्ही बोललेली इच्छा पूर्ण झाली तर, पूजेसाठी पुन्हा देवीच्या दरबारात येऊ.”
जहीर खान सुबह #झारखंड के #सुप्रसिद्ध #धर्मस्थल रजरप्पा स्थित मां छिन्नमस्तिके मंदिर पहुंचे खान पत्नी सागरिका घाटगे के साथ मंगलवार को पहुंचे, मंदिर में जाहिर ने 20 मिनट तक पत्नी #सागरिका घाटके संग #पूजा #अर्चना कर मां का आशीर्वाद प्राप्त किया@ImZaheer pic.twitter.com/Wc4jybHvlz
— Really C̶̶O̶̶b̶̶R̶̶A̶ ???? ریللےکوبرا (@YOUSUF_AZAZ) March 9, 2021
आस्था–:भारतीय क्रिकेट टीम के पुर्व तेज गेंदबाज जहीर खान ने झारखण्ड़ के विश्व प्रसिध्द #माँ_छिनमस्तिका_मंदिर रजरप्पा (रामगढ़) में किया-पूजा पाठ।@ImZaheer @ImZaheer1 @msdhoni pic.twitter.com/7oXpWmGX0A
— Ashish Kumar yadav (@AshishK04368089) March 9, 2021
भारताचा प्रमुख गोलंदाज राहिला आहे झहीर
झहीर खान भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज राहिला आहे. त्याने भारताकडून ९२ कसोटी सामने आणि २०० वनडे सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने १७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने आणि १०० आयपीएल सामन्यांमध्येही भाग घेतला आहे. झहीरने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ आणि २०० वनडे सामन्यांमध्ये २८२ बळी घेतले आहेत. तो भारतासाठी दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आहे सागरिका
झहीरची पत्नी सागरिका हिच्याविषयी बोलायचे झाले तर, तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तीला ‘चक दे इंडिया’ चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटासाठी सागरिकाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. झहीर आणि सागरिकाने २४ एप्रिल २०१७ रोजी साखरपुडा आणि त्याच वर्षी २३ नोव्हेंबर रोजी लग्न केले.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रमवारी: रिषभ पंतची पहिल्या १० फलंदाजांमध्ये एन्ट्री; रोहित शर्मासह ‘या’ क्रमांकावर विराजमान
अरेरे! ‘मिस्ट्री स्पिनर’ची फिटनेस साथ देईना, टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न राहणार अधुरं?
जुनं ते सोनं! जी जर्सी अंगावर चढवून सचिनने विश्वचषक खेळला, त्याच जर्सीत पुन्हा उतरणार टीम इंडिया






