भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला ३-२ ने पराभवाची धूळ चारली आहे. ही मालिका टी२० विश्वचषक २०२१च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली होती. या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळाला होता. कर्णधार विराट कोहली स्वतः रोहित शर्मासोबत सलामीला आला होता. अशातच माजी भारतीय गोलंदाज झहीर खानने या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूचे कौतुक करत त्या खेळाडूमुळे विराटला सलामीला जाता आले असल्याचे सांगितले आहे.
भारतीय संघाने या मालिकेतील पहिल्या ४ सामन्यात, सलामी जोडीमध्ये अनेक बदल करून पाहिले. परंतु कुठल्याही जोडीला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पाचव्या टी -२० सामन्यात विराटने रोहितसोबत सलामीला जाण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय यशस्वी देखील झाला.
अशातच माजी भारतीय गोलंदाज झहीरने सूर्यकुमार यादवचे कौतुक करत म्हटले आहे की, “हे सर्व संभव झाले आहे. कारण भारतीय संघाला सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज भेटला आहे. यादवने सिद्ध केले आहे की, तो तिसऱ्या क्रमांकावर जाऊन मैदानात काय करू शकतो. मला वाटते या गोष्टीला सुरुवात येथूनच झाली असावी.”
कोहलीने देखील म्हटले होते की, “मी सतत फलंदाजी क्रमात खालच्या क्रमांकावर नाही खेळू शकत. श्रेयस अय्यरला देखील खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागत आहे. त्यामुळे मी सलामीला जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर यादवला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.”
पाचव्या टी-२० सामन्यात विराट आणि रोहितच्या जोडीने सलामीला येऊन ९ षटकात ९४ धावा जोडल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाने २२४ धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना भारतीय संघाने ३६ धावांनी जिंकला होता. त्यामुळे कोहलीने सामना झाल्यानंतर आपण येत्या आयपीएल हंगामातदेखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी सलामीला फलंदाजी करणार असल्याचे मत मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाच्या २०व्या वर्षी राधा यादवचा ‘विश्वविक्रम’; केला कुणालाही न जमलेला किर्तीमान
दिग्गज शेवटी दिग्गजचं असतो! रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सेहवागचे वादळ, प्रदर्शनावर टाका एक नजर
खराब फॉर्ममध्ये असलेल्या राहुलला माजी दिग्गजाचा पाठिंबा, वनडेत संधी देण्याची केली मागणी