रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने गेल्या आठवड्यात टी२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे तिनही सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकली होती. नुकत्याच पार पडलेल्या टी२० विश्वचषकात नाणेफेकच्या बाबतीत भारताची कामगिरी खराब झाली होती. याबद्दल माजी वेगवान गोलंदाज झहिर खानने भारतीय टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्माची फिरकी घेतली. यावेळी त्याने रोहितला ज्या नाण्याने नाणेफेक केली त्यात काही ठेवले होते का? असेही विचारले.
नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताने तीनपैकी तीन नाणेफेक जिंकल्या यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे झहीरने ट्विट केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना वसीम जाफरने ट्विट केले आणि लिहिले की, टसलग तीन नाणेफेक जिंकणे दुर्मिळ आहे, परंतु, वसिम जाफरने झहीर खानपेक्षा चांगली गोलंदाजी आहे, यापेक्षा दुर्मिळ नाही.’ जाफरचे हे ट्विट लोकांना खूप आवडले. विशेष म्हणजे वसीम जाफरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ दोन विकेट्स घेतल्या आहेत.
Yes winning 3 tosses in a row is rare but not as rare as Wasim Jaffer having better bowling figures than Zaheer Khan 😆 https://t.co/YRl0QfdytC pic.twitter.com/0Px01SrKih
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 24, 2021
सन २००२ मध्ये टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात अँटिग्वा येथे झालेल्या चौथ्या कसोटीत त्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या. या कसोटी सामन्यात जाफरने १८ धावांत २ बळी घेतले. त्याचवेळी झहीर खानने १२८ धावांत २ बळी घेतले. सामना अनिर्णित राहिला आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी एक डाव खेळला.
या कसोटी सामन्यात सर्व ११ खेळाडूंनी टीम इंडियासाठी गोलंदाजी केली होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २४८ षटकात ९ गडी गमावून ६२९ धावा केल्या. त्याचवेळी भारताने पहिल्या डावात १९६ षटकात ५१३ धावा केल्या. या सामन्यात भारतासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि रात्रा यांच्यात सातव्या विकेटसाठी २१७ धावांची भागीदारी झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉटसनने निवडले टी२० क्रिकेटमधील टॉप-५ फलंदाज, रोहित नव्हे ‘या’ भारतीयाला दिली जागा
श्रेयस अय्यरच्या वडीलांनी गेल्या ४ वर्षांपासून बदलला नव्हता व्हॉट्सअप डीपी, ‘हे’ होतं मोठं कारण
‘या’ प्रकरणी वॉनविरुद्ध बीबीसीची कठोर कारवाई, पण इंग्लंडच्या माजी कर्णधाराने आरोपांना म्हटले निराधार