झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना बुधवार (11 डिसेंबर) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाने शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक धावांचा पाठलाग करत सामना जिंकला. झिम्बाब्वेच्या विजयाचा हिरो सलामीवीर ब्रायन बेनेट ठरला. ज्याने 49 धावांची शानदार खेळी खेळली. तर अफगाणिस्तानच्या पराभवाचा दोषी नवीन उल हक होता. ज्याने एका षटकात 13 चेंडू टाकले. ज्यात त्याने एकूण 19 धावा केल्या. हे षटकचं सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये 33 धावांवर संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. 58 धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. मात्र, यानंतर करीम जनात (54) आणि मोहम्मद नबी (44) यांनी 79 धावांची भागीदारी करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. संघाने मर्यादित 20 षटकात 6 गडी गमावून 144 धावा केल्या.
या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने अतिशय हुशारीने फलंदाजी केली. 14व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या 2 गडी गमावून 88 धावा होती. संघाला शेवटच्या 36 चेंडूत 57 धावांची गरज होती. ज्यात झिम्बाब्वेला एका मोठ्या षटकाची गरज होती. ती उणीव नवीन उल हकने 15व्या षटकातच भरून काढली.
नवीन उल हकचे हे षटक 13 चेंडूंचे होते. ज्यात त्याने 6 वाइडसह 1 नो बॉल टाकला. या षटकात त्याने एकूण 19 धावा खर्च केल्या आणि हे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले.
राशिद खानने हुशार कर्णधारपणा दाखवत पुढच्या षटकात आक्रमण करत ब्रायन बेनेट आणि रायन बर्लच्या रूपाने दोन मोठे बळी घेतले. मात्र, नवीन उल हकने झिम्बाब्वेचा मार्ग सुकर केला होता. मात्र तो संघाला विजयी करु शकला नाही. त्यानंतर झिम्बाब्वेने 18व्या षटकात 4 धावा, 19व्या षटकात 10 धावा आणि 20व्या षटकात 11 धावा करत रोमहर्षक विजयाची नोंद केली.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफी वादात नवा ट्विस्ट! वनडे ऐवजी टी20 फॉरमॅट मध्ये स्पर्धा होणार?
स्मृती मानधानाचा विश्वविक्रम, अशी कामगिरी करणारी जगातील पहिली क्रिकेटर!
SMAT: बंगाल, उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्राचे स्वप्न भंगले, उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले