येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. ही स्पर्धा यापूर्वी भारतात होणार होती. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती पाहता, ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर आणखी एक मोठी स्पर्धा पार पडणार आहे, ज्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) दिली आहे.
आयसीसीने गुरुवारी (१९ ऑगस्ट) एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने म्हटले आहे की, २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत महिला विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामने झिम्बाब्वेमध्ये पार पडणार आहेत. तसेच ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान महिलांची विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये पार पडणार आहे.
पात्रता फेरीतील सामने जिंकून येणारे संघ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेत पात्र ठरलेल्या ५ संघासोंबत खेळतील. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. पात्र संघांपैकी ३ संघ आणि पुढील नवे २ संघ मागील आयसीसी महिला अजिंक्यपदमध्ये पहिल्या ५ स्थांनावर राहिलेल्या संघांसोबत आपली जागा निश्चित करतील. यामुळे आयसीसी महिला अजिंक्यपदच्या तिसऱ्या पर्वात संघांची संख्या ८ वरुन १० पर्यंत पोहोचेल.(Zimbabwe will host 2022 Icc women’s World Cup qualifiers)
आयसीसीचे स्पर्धा प्रमुख ख्रिस टेटली यांनी म्हटले की, “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता ही आमच्या दिनदर्शिकेतील एक अतिशय महत्वाची स्पर्धा आहे. कारण यामुळे संघांना केवळ विश्वचषकासाठी पात्र होण्याची संधीच मिळणार नाही, तर आयसीसी महिला अजिंक्यपदच्या पुढील फेरीत अंतिम दोन सहभागी देखील निश्चित होतील.”
स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यात बांगलादेशव्यतिरिक्त इतर ९ संघ सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये आयर्लंड, नेदरलँड, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, श्रीलंका, थायलंड, अमेरिका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे हे संघांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का! गंभीर म्हणतोय, “भारत पाकिस्तानपेक्षा मजबूत, पण अफगानिस्तानपासून आहे धोका”
बीसीसीआयच्या ‘या’ घोषणेने आयपीएल फ्रँचयाझींची वाढवली चिंता, एकटी सीएसके मात्र निश्चिंत
‘सचिन अन् द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत कोहली पुढे जातोय,’ विरोधी संघातून कौतुक