बेंगलोर | भारत विरुद्ध अफगानिस्तान एकमेव कसोटी सामन्यात भारताने २६५ धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. हा सामना भारताने केवळ दोन दिवसांत जिंकला. अशी कामगिरी करणारा भारत अशिया खंडातील पहिला देश बनला.
या सामन्यात आज अफगाणिस्तानने पहिल्या डावात १० डावात १०९ तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या.
आज ते भारताचा डाव संपल्यावर फलंदाजीला आले. भारताचा डाव सकाळी ११ वाजून ३४ मिनीटांनी संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अफगानिस्तानचा दुसरा डाव ५ वाजून ३० मिनिटांनी संपुष्टात आला.
त्यात त्यांचा पहिला डाव संपल्यावर भारताने त्यांना फाॅलो-आॅन दिला. पहिल्या डावात त्यांता वफादार हा गोलंदाज नाबाद राहिला तर दुसऱ्या डावात हशमतुल्लाह शाहिद हा नाबाद राहिला.
यामुळे केवळ ७ तासांत त्यांचे तब्बल ९ फलंदाज प्रत्येकी २ वेळा बाद झाले तर दोन फलंदाज प्रत्येकी एकदा बाद झाले.
एका दिवसांत विरोधी संघाला दोन वेळा बाद करणारी टीम इंडिया पहिला संघ ठरली आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही संघाला एकाच दिवसांत १० फलंदाजांना प्रत्येकी दोन वेळा बाद करता आले नाही हे विशेष.
महत्त्वाच्या बातम्या:
–टी-20 चा सुपरहीरो कसोटीमध्ये ठरला झीरो!
–माझ्या शतकामागे रशिद खानचा हात- शिखर धवन
–तब्बल 57 वर्षानंतर जुळून आला भारतीय क्रिकेटमध्ये हा योगायोग