---Advertisement---

कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणारा भारतीय दिग्गज

On: शुक्रवार, मार्च 18, 2022 10:51 AM
---Advertisement---

भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांची आज ७४ वी जयंती. त्यांचा जन्म १८ मार्च १९४८ मध्ये बॉम्बे अर्थात मुंबईत झाला होता. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या सोलकरांनी भारताकडून पहिला कसोटी सामना १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळला होता.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारताकडून त्यांनी २७ कसोटी सामने आणि ७ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्यांनी १०६८ धावा केल्या. यात १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी वनडेमध्ये २७ धावाही केल्या आहेत.

सोलकर हे जगातील एकमेव कसोटी क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी १२ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी डावांमध्ये सरासरी १ पेक्षा जास्त झेल (Catch) घेतले आहेत. त्यांनी २७ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्यांनी ४८ डावांत ५३ झेल झेलले आहेत.

आपण कायम जाँटी ऱ्होड्स (Jonty Rhodes) याने क्षेत्ररक्षणाची व्याख्या बदलली असे ऐकत आलो. मात्र सोलकर यांनी त्यांच्या काळात आपल्या क्षेत्ररक्षणाने क्रिकेतजगतावर आपली छाप उमटवली होती. फलंदाजाच्या अगदी जवळ उभे राहून हेल्मेट न घालता सोलकर क्षेत्ररक्षण करत.

कधीकधी तर त्यांना चेंडू लागेल म्हणून फलंदाजच घाबरून फटका मारत नसे. त्यांच्या क्षेत्ररक्षणाने प्रभावित होऊन ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज बिल लॉरी (Bill Lawry) यांनी आपली बॅट त्यांना भेट म्हणून दिली होती. काहीजण तर एकनाथ सोलकर यांना त्यांच्या झेल घेण्याच्या क्षमतेमुळे सोलकरऐवजी झेलकर म्हणत असत.

सोलकर यांच्या बेधडक क्षेत्ररक्षणामुळे त्यांना सर्वकालिन ११ जणांच्या यादीतील खेळाडूंमध्ये गणले जाते. सोलकर यांनी ८ वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

१९७०-७१ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies) कसोटीत भारतीय संघाने पहिल्यांदाच मिळलेल्या विजयात सोलकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी या सामन्यात ६ झेल घेतले होते. हा एक विश्वविक्रम ठरला होता. इतकेच नव्हे तर १९७१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही सोलकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी

अन् ‘त्या’ षटकाराने दिनेश कार्तिक हिट झाला!

सचिनने बरोबर १० वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळलेला ‘तो’ सामना अविस्मरणीयच, कारणही आहे खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---