---Advertisement---

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने खेळणारे २ भारतीय दिग्गज

On: शुक्रवार, सप्टेंबर 4, 2020 12:12 PM
---Advertisement---

क्रिकेटची सुरुवात कसोटी क्रिकेटपासून झाली. कालांतराने क्रिकेटमध्ये बदल होत गेले आणि वनडे व टी-२० क्रिकेट उदयास आले. टी-२० क्रिकेट येण्यापूर्वी वनडे क्रिकेटला कसोटी क्रिकेटपेक्षा जास्त पसंती देण्यात आली होती, परंतु क्रिकेटचे हे सर्वात लहान रूप पाहिल्यानंतर वनडे आणि कसोटी क्रिकेटपेक्षा लोक टी-२० कडे जास्त आकर्षित झाले. म्हणूनच इंडियन प्रीमियर लीग सारख्या यशस्वी क्रिकेट लीगची सुरुवातही भारतात झाली आणि त्याचे १२ यशस्वी हंगाम पूर्ण झाले.

पहिला टी-२० विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला होता आणि तो भारतीय संघाने जिंकला होता. त्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन सातत्याने केले जात असून या प्रकाराला बरेच यश मिळाले आहे. कोणत्याही संघाच्या दौऱ्यात टी-२० मालिका आयोजित केली जाते. आजकाल लोकांकडे वेळ कमी आहे आणि या स्वरूपात त्यांना कमी वेळात रोमांचक सामने पाहायला मिळतात.

टी-२० क्रिकेट जसजशी प्रगती करत आहे, तसतसे त्याला स्टार खेळाडूही मिळाले आहेत. या स्वरूपात आतापर्यंत बर्‍याच खेळाडूंनी सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या खेळाडूंना टी-२० मधील उत्कृष्ठ खेळाडू मानले जाते. त्याचबरोबर भारतीय खेळाडूही कमी नाहीत. या स्वरूपात भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट आहे. विशेषत: फलंदाजांनी उत्तम खेळ दाखविला आहे.

अनेक भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत अनेक टी-२० सामने खेळले आहेत. या लेखात तुम्हाला २ भारतीय फलंदाजांविषयी सांगू ज्यांनी भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले २ भारतीय खेळाडू-

२. एमएस धोनी (MS Dhoni) – ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतरही त्याने २०१६ टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व केले.

एमएस धोनी हा भारतासाठी दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक टी-२० सामने खेळणारा खेळाडू आहे. ९८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने १६१७ धावा केल्या आहेत. त्याने फिनिशर म्हणून संघासाठी मोठे योगदान दिले आहे.

१. रोहित शर्मा (Rohit Sharma) – १०८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने

भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे जो भारताकडून १०० पेक्षा जास्त टी-२० सामने खेळला आहे. त्याने भारताकडून १०८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ३२.६ च्या उत्कृष्ट सरासरीने २७७३ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने टी-२० मध्ये ४ शतकेही केली आहेत. तर २१ टी-२० अर्धशतक रोहित शर्माच्या नावावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं

रिकी पॉन्टिंगने ‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचे केले तोंडभरुन कौतुक; म्हणाला…

आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे

ट्रेंडिंग लेख-

आश्चर्यच! या खेळाडूने एकाच दिवशी २ वेगवेगळ्या सामन्यात केले होती शतकं

गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते पण….

पाकिस्तानी दिग्गजाला माकडउड्या मारायला लावणाऱ्या किरण मोरेंची गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---