कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी (5 मार्च) रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी लाईट बंद करण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाचे सर्व भारतीय नागरिकांनी समर्थन केले होते.
मोदींनी यावेळी फक्त दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. परंतु लोकांनी थेट फटाके फोडले. लोकांच्या या कृत्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच दिग्गज व्यक्ती, क्रिकेटपटूंनीही विरोध दर्शविला. यामध्ये भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचाही समावेश आहे.
यावेळी इरफानने (Irfan Pathan) फटाके फोडणाऱ्या व्यक्तींबद्दल ट्वीटही केले. यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अपशब्द वापरण्यासही सुरुवात केली.
इरफानने आपल्या ट्वीटमध्ये फक्त लिहिले होते की, जोपर्यंत लोकांनी फटाक्यांचा वापर केला नव्हता तोपर्यंत हे सर्व चांगले चालले होते. परंतु यावरून लोकांनी त्याला फक्त धर्मावरून ट्रोलच केले नाही तर, त्याला अपशब्दही (Abuse) वापरले.
या दरम्यानचे स्क्रीनशॉट त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. त्यानंतर त्याने ट्विटर इंडियाला टॅग केले आणि ट्वीट केले की, “आम्हाला अग्निशमन ट्रकची आवश्यकता आहे. तुम्ही मदत कराल का?”
We need fire trucks can u help? @TwitterIndia pic.twitter.com/6sT92n9HRP
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 6, 2020
इरफान व्यतिरिक्त भारताच्या इतर फलंदाजांनीही फटाके फोडणाऱ्यांवर राग व्यक्त केला होता. यावेळी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या खासदार असलेल्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) ट्वीट केले होते की, “भारतीय जनतेने घरामध्ये राहिले पाहिजे. आपण आता या लढाईच्या मध्य भागात आहोत. ही वेळ फटाके फोडण्याची नाही.”
INDIA, STAY INSIDE!
We are still in the middle of a fight
Not an occasion to burst crackers ! #IndiaFightsCorona— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) April 5, 2020
त्यानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) याबद्दल ट्वीट केले की, “आपण कोरोना व्हायरसवर उपाय शोधू. परंतु या मूर्खपणावर कोणता उपाय शोधणार?”
We Will find a cure for corona but how r we gonna find a cure for stupidity 😡😡 https://t.co/sZRQC3gY3Z
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 6, 2020
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ भारतीय क्रिकेटपटूंची अतिशय वादग्रस्त वक्तव्य, ज्यामुळे देशात झाला होता राडा
-किंग कोहलीला आवडतो हा फक्त हा काॅमेंटेटर
-आयसीसी वर्ल्ड ११कडून खेळणारे ३ भारतीय महान क्रिकेटपटू