अँडरसनची कारकीर्द इतकी लांब कशी झाली, इंग्लिश वेगवान गोलंदाजाने स्वत: केले हे रहस्य उघड.
कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनल्यावर इंग्लंडचा जेम्स अँडरसन पुढच्या वर्षी होणाऱ्या ऍशेस मालिकेवर लक्ष ठेवून आहे. अशावेळी ऑस्ट्रेलियात खेळण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे तो म्हणाला.
अँडरसनने 2003 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि आतापर्यंत 17 वर्षात 156 कसोटी सामने खेळले आहेत. नुकत्याच पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 600 वा बळी घेतला.
अँडरसन म्हणाला की त्याच्या सडपातळ शरीर आणि परिश्रमांमुळे आतापर्यंत त्याची कारकीर्द इतकी मोठी करण्यास मदत झाली. तो म्हणाला, ‘यासारखे शरीर मिळविणे माझे भाग्य आहे. मी नैसर्गिकरित्या पातळ शरीराचा आहे, ज्यामुळे मला मदत झाली. मी जिममध्ये खूप मेहनत घेतली. जर मी दुखापतींपासून दूर राहिलो तर मी आणखी काही काळ खेळू शकेन.’
पुढील ऍशेस मालिका ऑस्ट्रेलियामध्ये नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान खेळली जाणार आहे.
बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमात तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणाऱ्या संघात सामील होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझी बळी घेण्याची भूक पूर्वीसारखीच राहिली आहे. मला अजूनही सामने खेळायला आवडतात, त्यामुळे मी माझा खेळ सुधारण्याचा आणि तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करत राहीन.”
या 38 वर्षीय खेळाडूने सांगितले की, जर तो बळी घेत राहिला तर त्याला ऍशेस संघात निवड होण्याची संधी मिळेल. अँडरसन म्हणाला, “जर येत्या काही महिन्यांत मी बळी घेत राहिलो तर ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर जाण्याची संधी मिळेल अशी मला मनापासून आशा आहे.”
पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी अँडरसनने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अझर अलीला बाद करून आपला 600 वा बळी घेतला. याआधी मुथय्या मुरलीधरन (800 विकेट), शेन वॉर्न (708) आणि अनिल कुंबळे (619) हे तीन फिरकी गोलंदाजांनी 600 कसोटी बळीचा टप्पा पूर्ण केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला बसला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू ४ महिने रहाणार क्रिकेटपासून दूर, हे आहे कारण
सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,
ट्रेंडिंग लेख-
-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा