इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाची तारिख खूप जवळ आली आहे. १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलसाठी आता जवळपास १५-१६ दिवसच उरले आहे. पण, अजूनही या टूर्नामेंटचे वेळापत्रक आयपीएल गवर्निंग कांउसिलने जाहीर केलेले नाही. पण स्वत: बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएलचे वेळापत्रक कधी घोषित होईल, याची माहिती दिली आहे. Sourav Ganguly Said That IPL 2020 Schedule Will Be Announced On 4 Sep
काल(३ सप्टेंबर) एबीपी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला की, “आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक ४ सप्टेंबरला म्हणजे उद्याच घोषित करण्यात येईल.” त्यामुळे काही दिवसांपुर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएल रद्द होते की काय? म्हणून सर्वत्र चर्चा चालू होती, त्यावर विराम लागेल.
यंदा कोरोना व्हायरसमुळे २९ मार्च रोजी सुरु होणाऱ्या आयपीएल २०२०च्या आयोजनाला उशीर झाला आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन २ टप्प्यात करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी बीसीसीआय अमिरात क्रिकेट बोर्डासोबत बोलणी करत आहे.
आयपीएलचा पहिला टप्पा दुबई आणि शारजाह येथे खेळला जाईल. तर दुसरा टप्पा अबू धाबी येथे होईल. सध्या शारजाहपासून ते दुबईपर्यंतच्या प्रवासासाठी कसलेही प्रतिबंध नसल्यामुळे, या दोन्ही शहरात आयपीएलचे ग्रुप स्टेजमधील एकूण ३५ सामने खेळण्यात येऊ शकतात. तर, अबू धाबी येथे आयपीएलच्या दूसऱ्या टप्प्यात ग्रुप स्टेजमधील १४ सामने होऊ शकतील. तर, प्लेऑफमधील ४ सामनेही याच शहरात पार पडू शकतात. मात्र, अजूनही वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे ४ सप्टेंबरला सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
आता रैना म्हणतो; सीएसकेत परत येणार, पण फक्त या व्यक्तीसाठी
नववी इयत्ता फेल; झाडू मारायचं करायचा काम मात्र आयपीएलने झटक्यात बदलली जिंदगी
आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने सर्वांसमोर दिली होती गर्लफ्रेंडला शिवी, आता होतं नाहीये लग्न
ट्रेंडिंग लेख –
मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट उतरेल ‘या’ ११ खेळांडूसोबत
आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार
आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!