कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेता, क्रिकेटच्या जुन्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता त्यात बऱ्याच नव्या नियमांचीही भर पाडली. त्यातील एक नियम म्हणजे, संघातील कोणत्याही खेळाडूला कोविड-१९ चे संक्रमण झाल्यास किंवा तशी लक्षणे दिसल्यास त्याच्याजागी बदली (सब्स्टीट्यूट) खेळाडूची निवड करणे. या नियमानुसार न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन लिस्टर हा पहिला कोरोना व्हायरस बदली खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडच्या प्लँकेट शील्ड प्रथम श्रेणी क्रिकेट चॅम्पियनशीपमधील ऑकलँड संघाचा क्रिकेटपटू मार्क चॅपमनमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे मंगळवारी (२० ऑक्टोबर) त्याच्याजागी ऑकलँड संघात लिस्टरला संधी देण्यात आली आहे.
ऑकलँड क्रिकेटने ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, “लिस्टरला कोविड-१९ बदली खेळाडूच्या रुपात ऑकलँड संघात सहभागी करण्यात आले आहे. कारण काल चॅपमनमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याच्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागणार आहे.”
TEAM NEWS | Ollie Pringle makes his First-Class debut becoming No. 5⃣2⃣4⃣.
Ben Lister starts as Covid-19 replacement with Mark Chapman awaiting test results after feeling ill yesterday. pic.twitter.com/ydc3gfZAOt
— Auckland Cricket (@aucklandcricket) October 19, 2020
२४ वर्षीय गोलंदाज लिस्टरने आतापर्यंत १८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४६ विकेट्स घेतल्या आहेत. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १९ सामन्यात ३२ विकेट्स आणि देशांतर्गत टी२० लीगमध्ये १९ सामन्यात २१ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘युवांमध्ये नाही तर चावला-जाधवसारख्या वयस्करांमध्ये कसली प्रतिभा,’ माजी क्रिकेटरची धोनीवर टीका
‘अजूनही सीएसकेसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे,’ माजी क्रिकेटरचे मोठे भाष्य
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…