कोव्हिड-19 या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या दीर्घकाळ विश्रांतीनंतर जगभरात पुन्हा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दोन संघात टी20 आणि कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र या मालिकेआधीच न्यूझीलंड संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
डी ग्रॅन्डहोम दुखापतीमुळे पडला बाहेर
न्यूझीलंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रॅन्डहोम याला उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला आहे. डॅरेल मिशेलला त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.
मिशेल सँटनर तिसऱ्या टी20 सामन्यात करणार नेतृत्व
त्याचबरोबर फिरकी गोलंदाज मिशेल सँटनर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या टी20 सामन्यासाठी कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करणारा सँटनर हा 8 वा कर्णधार असेल.
Squad news ahead of the first KFC T20I against @windiescricket on Friday at @edenparknz #NZvWI https://t.co/6EFZ4KqiD6
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 24, 2020
टिम साउथीला देण्यात आली विश्रांती
पहिल्या दोन टी20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व वेगवान गोलंदाज टिम साउथी करेल, तर तिसर्या टी20 सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सनला टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तो कसोटी मालिका खेळणार आहे.
अजाज पटेलही मालिकेला मुकणार
न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे मिशेल सँटनरला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. पटेल पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.
या दोन संघात होईल तीन टी20 आणि दोन कसोटी सामने
न्यूझीलंड वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. टी20 मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल तर कसोटी मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा ‘मुंबईकर’ सचिन तेंडुलकर रस्ता चुकल्यावर साधतो रिक्षाचालकाशी मराठीतून संवाद, पाहा व्हिडिओ
भारीच! विराट कोहली बनू शकतो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू
काय सांगता ! आपला झहीर खान होणार आमदार ?
ट्रेंडिंग लेख –
विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक
‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी; वाचा तिच्याबद्दल १० मनोरंजक गोष्टी
क्रिकेट इतिहासातील ३ सर्वात वादग्रस्त पंच, ज्यांचा पाकिस्तानशी आहे संबंध