मुंबई । लॉकडाऊनमुळे खेळाडू प्रशिक्षणापासून दूर राहिले होते. या कालावधीत सराव केलेला नसतानाही खेळाडूंची लय पाहून दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक रेयान हॅरिस खूप प्रभावित झाले आहेत. सहा दिवस क्वारंटाइनमध्ये असलेले हॅरिस बुधवारी मैदानावर आले. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू त्यांच्या देखरेखीखाली नेट्समध्ये सराव केला.
क्वारंटाईनमध्ये सहा दिवस घालवल्यानंतर बाहेर पडलेल्या हॅरिसने सांगितले की, त्यांना खूप बरे वाटत आहे. ते म्हणाले, ”खरं सांगायचं तर, सहा दिवस जास्त वेळ नसतो, परंतु ते माझ्यासाठी तीन आठवड्यांसारखे होते. कारण मी दीर्घकाळ रिकामा बसणारा व्यक्ती नाही. परंतु आज सकाळी जेव्हा मला डॉक्टरांकडून संदेश आला की चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, तेव्हा कदाचित माझ्यासाठी हा सर्वोत्कृष्ट संदेश होता. यानंतर खेळाडूंचे प्रशिक्षण पाहणे आश्चर्यकारक होते.”
“मला माहित आहे की, कोरोना साथीच्या आजारामुळे खेळाडू काही काळ सराव करु शकले नाहीत, परंतु त्यांना गोलंदाजी आणि फलंदाजी करताना पाहणे, मैदानाबाहेर मारलेले काही शॉट्स पाहून मी त्यांच्यापासून प्रभावित झालो आहे. कामाबद्दलची त्याची प्रामाणिकता अविश्वसनीय आहे. ज्या खेळाडूंनी पुरेसे प्रशिक्षण घेतले नाही, त्यांना या प्रकारे पाहून चांगले वाटले. ते खूप चांगल्या स्थितीत दिसत होते,” असेही हॅरिस यांनी सांगितले.
रिकी पॉन्टिंग यांनी खेळाडूंना दिला सल्ला
दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग देखील खेळाडूंचे प्रशिक्षण पाहून खूप आनंदात आहे. दुबईमध्ये उष्णता जास्त असल्याने काळजीपूर्वक सराव करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ मागील हंगामात पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली प्लेऑफमध्ये पोहोचला होता. यावेळीदेखील फ्रँचायझीला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. या संघात शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत असे फलंदाज आहेत. यावेळी अश्विन आणि रहाणेही या संघाकडून खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या जोफ्रा आर्चरने आपल्या मैत्रिणीसाठी तोडला होता ‘हा’ मोठा नियम
हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ
दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
ट्रेंडिंग लेख –
भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक
आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर