---Advertisement---

‘भारतीय गोलंदाज गुणवान, पण सातत्याचा अभाव’, टीम इंडियाच्या माजी अष्टपैलूचे वक्तव्य

On: मंगळवार, डिसेंबर 1, 2020 11:34 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. या दौर्‍यातील वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ३५० हून अधिक धावसंख्या उभारल्याने भारतीय गोलंदाजांवर टीकेची झोड उठली आहे. याच संदर्भात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने देखील आपले मत व्यक्त केले.

“गुणवत्तेबद्दल शंका नाही, परंतु कामगिरीत सातत्य हवे”

भारतीय गोलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव दिसून येतो, असे विधान इरफान पठाणने केले. पठाणने ट्वीट करत म्हटले की, “भारतीय गोलंदाजांच्या गुणवत्तेबद्दल कोणालाही शंका नाही. परंतु सातत्याचा अभाव, ही त्यांच्याबाबत प्रमुख समस्या आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर योग्य टप्पा सापडणे, हे सगळ्यात महत्वाचे आव्हान असते. मात्र, भारतीय गोलंदाजांना अजूनपर्यंत तरी ते जमले नाही.”

भारतीय गोलंदाजांचा हरवलेला फॉर्म

वनडे मालिकेतील दोन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाज फॉर्मसाठी झुंजत असल्याचे दिसले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी आयपीएलमध्ये चांगल्या लयीत होते. मात्र, ऑस्ट्रेलियन भूमीवर त्यांना अजूनपर्यंत आपला प्रभाव पाडता आला नाही. फिरकीपटू युझवेंद्र चहल देखील आपल्या फिरकीची जादू दाखविण्यात अपयशी ठरला. अशा परिस्थितीत तिसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन कुलदीप यादव आणि टी नटराजन यांना संधी देण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते’, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ ची कोर्टात धाव

Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक

ट्रेंडिंग लेख-

नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्‍यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार

भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---