---Advertisement---

मोठी बातमी! आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 8:27 PM
---Advertisement---

नेपाळचा आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछाने कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याने स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. तो आपल्या आरोग्याबाबत काळजी घेत आहे आणि तो लवकरच मैदानात पुनरागमन करणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

त्याने ट्वीट केले की, “तुम्हा सर्वांना हे सांगणे माझे कर्तव्य आहे की, माझी कोरोना चाचणी केली. यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो आहे. मला बुधवारपासून १८ नोव्हेंबर) काहीसा त्रास होत होता. परंतु माझ्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. जर सर्वकाही ठीक राहिले, तर मी पुन्हा मैदानात उतरेल.”

अवघ्या २० वर्षे वय असलेला संदीप आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो. त्याने जगातील अनेक टी२० स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

जगातील सर्वात मोठी टी२० इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. याव्यतिरिक्त तो बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धांमध्येही खेळतो.

कोरोना व्हायरसचा फटका मोठ्या प्रमाणावर झालेला दिसत आहे. नुकतेच न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ७  खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट

‘मला आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?’, इंग्लंडच्या कर्णधाराच्या प्रश्नावर विराटने दिले ‘हे’ उत्तर

फलंदाज म्हणून हार्दिक ऐवजी ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे होती संधी, माजी भारतीय दिग्गजाचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

वनडेत सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा करणारे संघ, भारताच्या नावे ‘हा’ विक्रम

आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ३ ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्ध पहिल्या वनडेत चमकले

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---