एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आजवर नोंदवले गेले आहे. परंतु १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल असा विक्रम केवळ पाच खेळाडूंना करता आला आहे. अष्टपैलू खेळाडूंसाठी ही पात्रता ठेवली तर आपल्याला यात सचिन, गांगुलीची नावेही दिसतील.
या यादीतील सर्व खेळाडू हे ३००पेक्षा जास्त वनडे सामने खेळलेले आहेत. धावा, विकेट व झेल यांमध्ये चांगल्या बॅलन्सचा विचार केला तर या ६ खेळाडूंपैकी अव्वल स्थानी सनथ जयसुर्या, जॅक कॅलिस, तिलकरत्ने दिलशान, सौरव गांगुली, ख्रिस गेल व शेवटची सचिनचा क्रमांक लागेल. सचिनने खूप धावा जरी केल्या असल्या तरी त्याच प्रमाणात विकेट्स घेतलेल्या नाहीत.
सचिन तेंडुलकर
सचिनने एकदिवसीय सामन्यांत १५९२१ धावा, १५४ बळी आणि १४० झेल घेतले आहेत. या कामगिरीसाठी सचिन ४६३ एकदिवसीय सामने खेळला आहे.
सौरव गांगुली
गांगुली भारताकडून ३११ एकदिवसीय सामने खेळला असून त्याने बरोबर १०० झेल एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतले आहे. विशेष म्हणजे मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या या खेळाडूने बळी देखील बरोबर १०० घेतले आहेत. तर फलंदाजी करताना ११३६३ धावा केल्या आहेत.
जॅक कॅलिस
ज्या खेळाडूला खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल तो म्हणजे आफ्रिकेचा जॅक कॅलिस. ३२८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना या खेळाडूने ११५७९ धावा करताना २७३ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत, तर क्षेत्ररक्षण करताना १३१ झेल घेतले आहेत.
सनथ जयसूर्या
श्रीलंका संघाचा माजी कर्णधार असणाऱ्या सनथ जयसूर्याने ४४५ सामन्यांत १३४३० धावा करत असताना गोलंदाजी विभागातही तब्बल ३२३ बळी मिळवले आहेत. १२३ झेल घेताना जागतिक क्रिकेटमध्ये जर कधी सर्वश्रेष्ठ अष्टपैलू कोण अशी यादी बनवली तर आपण त्यात अव्वल का असू याची झलकच दिली आहे.
तिलकरत्ने दिलशान
श्रीलंका संघाचा सलामीवीर आणि अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशान ३३० एकदिवसीय सामन्यांत ११८ झेल घेतले असून १०२९० धावा करताना १०६ बळी देखील घेतले आहे.
ख्रिस गेल
ख्रिस गेलने वेस्ट इंडिजकडून खेळताना ३०१ सामन्यांत १०,४८०धावा, १२५ झेल व १६७ विकेट्स घेतल्या आहेत. गेल या यादीत २०१९मध्ये सामील झालेला खेळाडू आहे कारण गेलला १० हजार धावा करण्यासाठी २०१९ला काही धावा कमी पडत होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
–जेन्हा सचिन विराटने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा घडले होते बाप योगायोग
-कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य
-कोरोनाने १५०० पेक्षा जास्त जीव घेतलेल्या देशात फसले आयपीएल प्लेअरचे वडिल
-त्याच हाॅटेलमध्ये कनिका कपूर थांबली होती, जिथं होता आफ्रिका संघाचा मुक्काम