fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आश्चर्यच! एकाच दिवशी २ वेगवेगळ्या टी२० सामन्यात त्याने केले शतक आणि अर्धशतक

Shaheryar Butt became the first to make a 50 & 100 on the same day in T20I cricket history!

August 29, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

लक्झेंबर्गमध्ये चेक रिपब्लिक, बेल्जियम आणि लक्झेंबर्ग या ३ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. या टी२० मालिकेत आज(२९ ऑगस्ट) बेल्जियमचा पहिला सामना लक्झेंबर्ग विरुद्ध झाला तर दुसरा सामना चेक रिब्लिक विरुद्ध झाला. या दोन्ही सामन्यात बेल्जियमचा कर्णधार शहेरियार बटने शानदार कामगिरी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विश्वविक्रमही केला आहे.

त्याने पहिल्यांदा आज लक्झेंबर्ग विरुद्ध ४५ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारासह नाबाद ८१ धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीमुळे बेल्जियमने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६५ धावा केल्या आणि लक्झेंबर्गला १६६ धावांचे आव्हान दिले होते. परंतु लक्झेंबर्गला २० षटकात ८ बाद १२८ धावाच करता आल्या. त्यामुळे बेल्जियमने हा सामना ३७ धावांनी जिंकला. बेल्जियमकडून खालिद अहमदीने ३ विकेट्स घेतल्या.

या सामन्यानंतर आजच बेल्जियमचा सामना चेक रिपब्लिक संघाविरुद्ध देखील झाला आहे. या सामन्यातही बेल्जियमने प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांचा कर्णधार बटने तुफानी खेळ करताना ४९ चेंडूत ११ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद १२४ धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीमुळे बेल्जियमने ६ बाद १९७ धावा केल्या आहेत आणि चेक रिपब्लिकला १९८ धावांचे आव्हान दिले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना चेक रिपब्लिकला ८ बाद १५१ धावाच करता आल्याने बेल्जियमने हा सामाना ४६ धावांनी जिंकला आहे. आशिकुल्ला सईदने बेल्जियमकडून ३ विकेट्स घेतल्या.

याबरोबरच बटने लक्झेंबर्गविरुद्ध अर्धशतक आणि चेक रिपब्लिक विरुद्ध आज शतक केल्याने तो एकाच दिवशी २ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अर्धशतक आणि शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आत्तापर्यंत एकाच दिवशी २ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात कोणत्याही खेळाडूला शतक आणि अर्धशतक करता आले नव्हते. 

याआधी अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादने एकाच दिवशी २ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्याने २०१७ ला संयुक्त अरब अमिरातीमध्ये ८ आयसीसीच्या सहयोगी सदस्ययी संघात खेळवण्यात आलेल्या डेझर्ट टी२० स्पर्धेत हा कारमाना केला होता.

या स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने आणि अंतिम सामना एकाच दिवशी म्हणजे २० जानेवारी २०१७ ला दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या उपांत्य सामन्यात ओमान विरुद्ध शेहजादने ६० चेंडूत ८० धावांची खेळी केली होती. यात त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले होते. तर अंतिम सामन्यात आर्यलंड विरुद्ध अफगाणिस्तानकडून शेहजादने पुन्हा एकदा अर्धशतकी धमाका करताना ४० चेंडूत नाबाद ५२ धावा करताना ९ चौकार आणि १ षटकार मारला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणून केकेआरने ख्रिस लिनला सोडले, खुद्द कर्णधाराने सांगितले कारण

काय सांगता! या खेळाडूने ६७ पेक्षा कमी चेंडू खेळून केलीत तब्बल ७ वनडे शतकं

…आणि असे एमएस धोनी कमावू लागला दिवसाला ६-७ हजार रुपये

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक

आयपीएलमध्ये फलंदाजांना रडकुंडीला आणणारे ६ भारतीय गोलंदाज

१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू


Previous Post

करियरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा शैक्षणिक कार्यासाठी राष्ट्रपती करणार सन्मान

Next Post

आरसीबी संघाची रणनीती; आता हा विस्फोटक खेळाडू करणार यष्टीरक्षण…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

आरसीबी संघाची रणनीती; आता हा विस्फोटक खेळाडू करणार यष्टीरक्षण...

एका चॅनेलने दिलेल्या धमकीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया सापडली मोठ्या संकटात

चोकर्स टॅग आरसीबी नक्की पुसरणार! यावेळी कारणही आहे तसंच खास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.