नवी दिल्ली । पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध नेहमी वाईट वक्तव्य करत असतो. नुकतेच त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वाईट विधान केले होते. यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी त्याची सोशल मीडियावरुन चांगलीच खरडपट्टी काढली.
हरभजननेदेखील त्याला मर्यादा न ओलांडण्याची चेतावणी दिली होती. तसेच त्याच्याशी मैत्रीही तोडली होती. तरी आफ्रिदी किती वाईट आहे याचा प्रत्यय यूट्यूबवर व्हायरल होत असलेल्या एका जून्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
२०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० सामन्यात आफ्रिदी चेंडू दाताने चावताना (कुरतडताना) दिसला होता. चेंडू चावण्यामुळे त्याच्यावर २ वर्षे टी२० मध्ये खेळण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर त्याने माफीदेखील मागितली होती.
आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला होता की, “मी असे करायला नको होते. हे अचानक घडले. मी सामना जिंकण्यासाठी आपल्या गोलंदाजांची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. जगात असा कोणताच संघ नाही जो चेंडूशी छेडछाड करत नाही. माझी पद्धत चूकीची होती. मी जे काही केले त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. मला सामना जिंकवायचा होता. परंतु असे करणे चूकीचे होते.”
क्रिकेटमध्ये कदाचित पहिल्यांदाच कोणताही खेळाडू न घाबरता लाईव्ह कॅमेऱ्या समोर चेंडूंशी छेडछाड (Ball Tampering) करत होता. आफ्रिदीच्या त्या कृतीमुळे चाहते आणि समालोचक पुरते आश्चर्यचकीत झाले होते. तो सर्वांसमोर नियमांचे उल्लंघन करत होता.
चेंडूशी छेडछाड करणे क्रिकेटमध्ये दंडनीय गुन्हा समजला जातो. आयसीसी आणि क्रिकेट संघांना यामध्ये समावेश असणाऱ्या खेळाडूंना दंड देण्याचा किंवा बंदी घालण्याचा अधिकार आहे. अनेक क्रिकेटपटू चेंडूमुळे चूकीच्या पद्धतीने फायदा होण्यासाठी चेंडूंबरोबर छेडछाड करतात.
दोन वर्षांपूर्वी २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ (Steve Smith), डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) हे खेळाडू चेंडू छेडछाडीच्या वादात अडकले होते. त्यावेळी तत्कालीन कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नरवर प्रत्येकी १ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांसाठी बंदी घातली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्लंडकडून ५ हजार धावा, आर्सेनलकडून १६ गोल करणारा अवलिया माॅडेल
-विरोध केला, पण देशाचे वाचवले तीन अब्ज रुपये
-आयपीएलचे यश या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खुपले; म्हणतो, आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा