महाराष्ट्राचे माजी रणजीपटू आणि फिटनेस प्रशिक्षक शेखर गवळी यांचे मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील दरीत पडून निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास सापडला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ४५ वर्षीय गवळी त्यांच्या मित्रांसह ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी संध्याकाळी ५ च्या सुमारास ते दरीत पडले. ते ज्यावेळी दरीत पडले त्यावेळी फोटो काढत होते आणि त्यांचा पाय घसरला.
त्यानंतर लगेचच नाशिक ग्रामीण पोलिंसांनी शोध मोहिम राबवली. परंतु नंतर अंधार झाल्याने त्यांना मंगळवारी संध्याकाळी ही शोधमोहिम थांबवावी लागली. त्यानंतर बुधवारी काही ट्रेकिंग ग्रुप्सने आणि पोलिंसांनी मिळून पुन्हा शोध घेतल्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या घसरण्याच्या स्थानापासून अंदाजे ५० मीटर खोलवर सापडला.
गवळी यांनी १९९७ ते २००२ च्या दरम्यान महाराष्ट्राकडून २ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यात त्यांनी ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ते गेले ३ वर्षे महाराष्ट्र संघाचे फिटनेस प्रशिक्षक होते.
त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि २ मुले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
किंग्स इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी असा घालवला समुद्र किनाऱ्यावर वेळ, पहा व्हिडिओ
सर्फराज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जांभई देणारा जगातील पहिला क्रिकेटपटू, पहा कुणी केली टीका
बापरे! आयपीएल खेळाडूंच्या कोरोना टेस्टसाठी बीसीसीआय करणार एवढे करोड खर्च
ट्रेंडिंग लेख –
काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!
आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल
मोठी बातमी – मुबंई इंडियन्सला धक्का! लसिथ मलिंगा आयपीएलच्या १३ व्या हंगामातून बाहेर