एस श्रीसंतने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. श्रीसंतने क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजीचा सराव करत असून त्याने ट्विट थ्रेड मधून त्याच्या गोलंदाजीच्या छोट्या क्लिप पोस्ट केल्या आहेत.
अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन श्रीसंत म्हणाला की ‘मी पुन्हा नेटवर आलो आहे. स्पाइक्स घालून धावणे उत्तम अनुभव आहे. श्रीसंतने केरळमधील अकादमीमध्ये सराव सुरू केला आहे आणि तो मोठ्या उत्साहात गोलंदाजी करताना दिसतो.’
Back in nets ..nd it’s the best feeling..wearing spikes and running in #blessed #Cricket #india #kerala #s36 cricket academy #family #NeverGiveUp pic.twitter.com/GprlVmREOi
— Sreesanth (@sreesanth36) August 30, 2020
श्रीसंत तंदुरुस्त आहे
श्रीसंत आता 37 वर्षांचा झाला आहे, परंतु त्याची फिटनेस छान दिसत आहे. धावताना त्याने तंदुरुस्तीवर कठोर परिश्रम केले हे स्पष्ट होत आहे.
— Sreesanth (@sreesanth36) August 30, 2020
श्रीसंतचे नाव आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यात आले होते. पोलिसांनी त्याला अटकही केली होती आणि बीसीसीआयने त्याला आजीवन निलंबित केले होते. मात्र, श्रीसंतला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आणि त्यांच्यावरील बंदी 7 वर्षांचीच करण्यात आली. ही बंदी यावर्षी पूर्ण होत आहे. त्यामुळे भारतीय संघात नाही तर किमान घरगुती क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळू शकते.
— Sreesanth (@sreesanth36) August 30, 2020
बंदी घातल्यानंतर श्रीसंतने अभिनय क्षेत्रातही प्रवेश केला.याशिवाय श्रीशांतने वादग्रस्त टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही भाग घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
ही भारतीय कंपनी झाली आयपीएलची पार्टनर; बीसीसीआयने केली घोषणा
जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा
चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
आयपीएल २०२० मधून बाहेर पडलेल्या रैनाच्या जागी लागू शकते या खेळाडूंची सीएसकेमध्ये वर्णी
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार