फेब्रुवारी २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे भारताचा पाचवा वनडे सामना झाला होता. तो सामना भारताने ३५ धावांनी जिंकला आणि ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा चक्क मराठीतून केदार जाधवला सल्ला देताना दिसला होता.
धोनीने न्यूझीलंडकडून मिशेल सँटेनर आणि टॉड ऍस्टल फलंदाजी करत असताना ३९ व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या केदार जाधवला ‘पुढे नको भाऊ…घेऊन टाक’ असा मराठीतून सल्ला दिला होता.
धोनीचा हा मराठमोळा आंदाज पाहून केदारसह अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण यामागील कहानीचा खूलासा केदारने नुकताच धोनीच्या ३९ व्या वाढदिवशी केला आहे.
केदारने याबद्दल बीसीसी मराठीसह केलेल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितले की ‘धोनीचा जेव्हा चांगला मूड असतो आणि ड्रेसिंगरुममध्ये मजामस्करी चालू असते, तेव्हा बरेचसे असे शब्द असतात, जे ते शिकायचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याने मला त्या सामन्याआधी की त्या मालिकेआधी विचारले होते की ‘मराठी में और क्या क्या बोल सकते है, विकेट इसका ले ले इसको क्या बोलते है’ तर मी त्याला सांगितलेले की त्याला घेऊन टाक असं आपण म्हणतो.’
‘शेवटच्या वनडेला, माझ्या लक्षातही नव्हतं; मला तो फक्त शिकेल असं वाटलं. पण सामन्यादरम्यान जेव्हा मी गोलंदाजीला आलो त्यानंतर २-३ चेंडू टाकल्यावर त्याने ती कमेंट दिली की भाऊ घेऊन टाक. हे खूप आश्चर्यकारक होतं कारण मी पण विसरलो होतो मी असं काही त्याला सांगितले आहे, असा होता तो अनुभव’
केदार आणि धोनी यांच्यात चांगली मैत्री असून हे दोघे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडूनही एकत्र खेळतात.
ट्रेंडिंग घडामोडी –
आनंदाची बातमी: आता टी२० विश्वचषक नाही, तर आयपीएलचे होणार आयोजन
पत्रास कारण की… केदारचे धोनीला बर्थडे स्पेशल पत्र
ब्रॅड हॉग म्हणतात, रोहित-विराटमध्ये या खेळाडूकडे आहे सचिनच्या १००शतकांचा विक्रम मोडण्याची धमक