कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पण आता आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाणार आहे.
आता पुन्हा एकदा आयपीएलच्या सर्व संघांनी स्वत: ची तयारी सुरू केली आहे. सर्व संघ आता युएईत जोरदार सराव करत आहेत. तर त्याचबरोबर खेळणारे अंतिम अकरा खेळाडूंविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यात असे दिसून येते की ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना यावेळी क्वचितच खेळण्याची संधी मिळेल. त्या ५ परदेशी खेळाडूंबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत. जे त्यांच्या संघासाठी नियमितपणे खेळताना दिसतात. पण दिग्गज खेळाडू असूनही, आयपीएल २०२० मध्ये त्यांना अंतिम अकरामध्ये खेळायला मिळणे फार कठीण आहे.
१. जेसन रॉय – दिल्ली कॅपिटल
इंग्लंड संघाचा प्रमुख सलामीवीर जेसन रॉयचा समावेश आजच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट खेळाडूंमध्ये केला जातो. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याला खूप पसंती दिली जात आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा सदस्य आहे. दिल्ली कॅपिटल संघात सलामीवीर म्हणून शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यापूर्वीच आहेत. ज्यामुळे जेसन रॉयला प्लेइंग इलेव्हनमध्ये (अंतिम अकरा) संधी मिळणे फारच अवघड आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ ४ परदेशी खेळाडूंना खेळवण्याचा नियमही यात अडथळा आणत आहे.
जेसन रॉय आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त ८ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने २९.८३ च्या सरासरीने १७९ धावा केल्या आहेत. रॉयचा स्ट्राइक रेट १३३.५८ आहे.
दरम्यान, त्याने १ अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर त्याने ९१ धावांची खेळी केली आहे. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे.
२. मोईन अली – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
गेल्या आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासाठी मोईन अलीने चांगली कामगिरी केली. परंतु त्यानंतरही विराट कोहली त्याच्या अंतिम अकरामध्ये क्वचितच समावेश करु शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ या ४ परदेशी खेळाडूंना संधी देताना दिसेल, त्यात अॅरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस मॉरिस आणि डेल स्टेन अशी नावे असतील. ज्यामुळे मोईन अलीला बरीच प्रतीक्षा करावी लागेल. केवळ ४ परदेशी खेळाडू हे अंतिम अकराचा भाग होऊ शकतात.
मोईन अली आतापर्यंत आयपीएलमध्ये १६ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने २४.७५ च्या सरासरीने २९७ धावा केल्या आहेत. ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. अलीचा स्ट्राइक रेट १६५.९२ आहे. गोलंदाजीत त्याने २९.५६ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या आहेत.
३. जोश हेझलवुड – चेन्नई सुपर किंग्ज
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडचे नावही या यादीमध्ये पाहायला मिळते. खूप वेळानंतर जोशला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याला आपल्या संघात आयपीएल २०२०साठी जोडण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्ज संघही ४ परदेशी खेळाडूंच्या बाबतीत इम्रान ताहिर, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन आणि ड्वेन ब्राव्हो यांना पहिली संधी देईल. त्यानंतर सॅम करन आणि लुंगी एन्गिडीलाही संधी देण्यात येईल. या कारणास्तव जोश हेझलवुडला खेळण्यास संधी मिळेल असे दिसत नाही.
जोश हेजलवुडने आतापर्यंत आयपीएलमध्ये पदार्पण केले नाही. याआधी तो काही काळ मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. पण त्याला तिथे खेळण्याची संधी मिळू शकली नाही. आता त्याचबरोबर असेच काहीतरी चेन्नई सुपर किंग्जमध्येही होऊ शकते.
४. मोहम्मद नबी – सनरायझर्स हैदराबाद
अफगाणिस्तान संघाचा अनुभवी फिरकी अष्टपैलू मोहम्मद नबी हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. ज्याने आयपीएलमध्येही सतत स्वत: ला सिद्ध केले आहे. पण त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ त्याला या वेळी खेळण्याची फारच कमी संधी देऊ शकेल.
सनरायझर्स हैदराबादचा संघही ४ परदेशी खेळाडूंच्या समस्येवर झगडताना दिसू शकतो. या संघात जॉनी बेअरस्टो, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि राशिद खान दिसणार आहेत. ज्यामुळे मोहम्मद नबीचा नंबर दिसत नाही.
मोहम्मद नबी आतापर्यंत आयपीएलमध्ये १३ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने १५ च्या सरासरीने १३५ धावा केल्या आहेत. नबीचा स्ट्राइक रेट १४८.३५ आहे. जर त्याच्या गोलंदाजीबद्दल चर्चा केली तर त्याने २७.१८ च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत. ज्याला एक उत्कृष्ट कामगिरी म्हटले जाऊ शकते.
५. नॅथन कुल्टर नाईल – मुंबई इंडियन्स
वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलचे नावही या यादीमध्ये पाहायला मिळते. हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आयपीएलमध्ये बर्याच संघांसाठी खेळला आहे. जिथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. नॅथन पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग झाला आहे.
मुंबई इंडियन्स संघात परदेशी खेळाडू खूप चांगले आहेत. जेव्हा ४ प्रमुख खेळाडूंचा विचार केला तर क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा आणि ट्रेंट बोल्ट यांची नावे दिसतात. ज्यामुळे ख्रिस लिन आणि नॅथन कुल्टर नाईल यांची नावे खूप मागे असल्याचे दिसते.
आयपीएलमध्ये नॅथन कुल्टर नाईल आतापर्यंत २६ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने १९.९७ च्या सरासरीने ३६ बळी घेतले आहेत. त्याने एकदा ४ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० – प्रत्येक संघाकडे असणारा एक परदेशी खेळाडू जो एकहाती बदलू शकतो सामन्याचा निकाल…
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२०: सर्वाधिक धावा करणारे आणि विकेट घेणारे अव्वल १० क्रिकेटपटू…
या ४ संघांना भारताने सर्वाधिक वनडे सामन्यात केले पराभूत
महत्त्वाच्या बातम्या –
झाडावर बसून ‘चिल’ करणारा विराट पाहिलाय का? पाहून व्हाल चकित…
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाली सामान जप्त करण्याची धमकी, पाक बोर्ड म्हणतंय…
जेव्हा हा दिग्गज म्हणाला होता, ‘विराट कोहली नव्हे तर अजिंक्य रहाणेला करा भारताचा कर्णधार’