झिम्बाब्वेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) रोजी रावळपिंडी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानच्या आव्हानाचे पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. मात्र, सध्या ब्रेंडनच्या शतकापेक्षा त्याने मारलेल्या एका चौकाराची सर्वत्र चर्चा होत दिसत असून या चौकाराचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
झाले असे की, पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत २८१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या ५ षटकात झिंबाब्वे संघाला ४८ धावांची आवश्यकता होती. अशामध्ये पाकिस्तानकडून ४५ वे षटक शाहीन आफ्रिदी टाकत होता आणि झिंबाब्वेकडून ब्रेंडन टेलर फलंदाजी करत होता.
या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शाहीनने तब्बल १४८.८ किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला. या चेंडूवर ब्रेंडनने जास्त मेहनत न घेता आपली बॅट केवळ स्टम्पच्या पुढे झुकवली. यावेळी चेंडू बॅटला लागून थेट चौकार गेला. त्याने खेळलेला हा शॉट प्रशंसनीय होता.
या चौकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Pricd05/status/1322183522770067456
ब्रेंडनने या सामन्यात ११७ चेंडूंचा सामना करत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११२ धावा कुटल्या. असे असले तरी त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. झिंबाब्वे संघाचा डाव २५५ धावांवरच संपुष्टात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
-वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
-Video : मिस्ट्री स्पिनरच्या जाळ्यात अडकला धोनी; हंगामात दुसऱ्यांदा झाला बोल्ड
-Video : ‘त्यांना भेटायला उत्सुक आहे’ अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कपिल देव यांनी व्यक्त केली इच्छा
ट्रेंडिंग लेख-
-त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
-भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…