आपल्यापैकी अनेकांना गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनापेक्षा फलंदाजाची फटकेबाजी पाहायला आवडते. क्रिकेटविश्वात असे अनेक दिग्गज होऊन गेले आहेत, ज्यांनी अशा चाहत्यांची कधीच निराशा केली नाही. या फलंदाजांच्या बॅटमधून जेव्हा धावा निघतात, तेव्हा विरोधी संघाच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी होते. संघाच्या कर्णधाराला श्रेत्ररक्षण आणि गोलंदाजी आक्रमणात सतत बदल करण्याची वेळ येते. आपण ये लेखात अशाच तीन दिग्गजांचा विचार करणार आहोत, ज्यांनी टी-20 क्रिकेटमध्ये अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक केले आहे आणि विरोधी संघातील गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला होता.
या खेळाडूंनी टी-20 क्रिकेटमध्ये अवघ्या 12 चेंडूत केले आहे अर्धशतक
युवराज सिंग –
भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) 2007 साली खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकत सर्वात जास्त चर्चा झालेला खेळाडू होता. त्याने इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार मारले आणि अवघ्या 12 चेंडूत स्वतःचे अर्धशतक केले होते. युवराजने या डावात अवघ्या 16 चेंडूत 58 धावा केल्या, ज्यामध्ये एकापेक्षा एक अशा 7 षटकारांचा समावेश होता. भारतीय संघाने हे सामने 18 धावांनी जिंकले होते. युवराजची ही वादळी खेळी आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलेली असते.
ख्रिस गेल –
वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ख्रिस गेल (Chris Gayle) त्याच्या राष्ट्रीय संघासाठी अनेकदा महत्वापूर्व खेळी केली आहे. गेल नेहमीच मैदानात मोठमोठे शॉट्स मारताना दिसला आहे. आयपीएलमध्येही त्याने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला आहे. गेल बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्स संघाचाही एक महत्वाचा खेळाडू राहिला आहे. मेलबर्न संघासाठी खेळताना त्याने एडिलेड स्ट्रायकर्स संघाविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक केले. गेलने 17 चेंडूत 56 धावा केल्या होत्या. या धावा त्याने 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने केल्या आहेत. दुर्दैवाने ख्रिस गेलच्या संघाला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
हजरतुल्लाह जजई –
हजरतुल्लाह जजई (Hazratullah Jazai) याने अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये सहा चेंडूंवर सलग सहा षटकार मारले होते. त्याने 12 चेंडूत अर्धशतक देखील पूर्ण केले होते. काबुल ज्वानन संघासाठी खेळताना बल्ख लिजेंड्स संघाविरुद्ध जजईने 17 चेंडूंत 62 धावांची खेळी केली. या वादळी खेळीनंतर देखील तो स्वतःच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
त्याने झेपही घेतली अन् तो पडलाही, पण कॅच मात्र सोडला नाही, पाहा बटलरचा अविश्वसनीय झेल
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेवॉन कॉनवेचा विश्वविक्रम, कुटल्या नाबाद 92 धावा