कसोटी क्रिकेटमध्ये काही खेळाडू फलंदाजीत उत्तम कामगिरी करतात, तर काही खेळाडू गोलंदाजीत उत्तम कामगिरी करतात. परंतु एकाच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत चांगली खेळी करणारे अष्टपैलू खेळाडू क्वचितच पाहायला मिळतात. जेव्हा खेळाडू दोन्हीमध्ये उत्कृष्ट खेळी करतात, तेव्हा ते मोठा विक्रम करतात. अशीच कामगिरी भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) मोहाली कसोटीमध्ये केली आहे. या लेखात आपण अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गोलंदाजीत जास्त विकेट घेण्याबरोबरच १५० हून अधिक धावा केल्या आहेत.
१. मुश्ताक अहमद
पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू मुश्ताक अहमद साठच्या दशकात एक उत्तम अष्टपैलू होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत शानदार खेळी खेळल्या आहेत. या दरम्यान १९९७ मध्ये वेस्टइंडीजविरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्याने चमकदार कामगिरी केली होती. मुश्ताकने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही डावात मिळून १७७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने ९७ धावा देत पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट घेतल्या होत्या. त्याने संपूर्ण सामन्यात ८ विकेट घेतल्या होत्या.
२. गॅरी सोबर्स
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्सने सुद्धा फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्तम कामगिरी केली होती. विश्व क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज क्रिकेटचा सुवर्ण काळ चालला होता, तेव्हा सोबर्स हा संघाच्या मुख्य खेळाडूंपैकी एक होता. त्याच्या नावावर एकापेक्षा एक चांगल्या खेळी आहेत. त्याने गोलंदाजीत तर उत्तम कामगिरी केली आहे त्याबरोबरच फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली आहे. त्याने १९६६ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीमध्ये पहिल्या डावात १७४ धावा केल्या होत्या. तसेच त्याने दोन्ही डावात मिळून ८० धावा देत ८ विकेट घेतल्या होत्या. ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.
३. रविंद्र जडेजा
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा. जडेजा मागील काही काळात भारताकडून खेळताना सर्वोत्तम खेळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्या पहिल्या कसोटीत त्याने आपल्या अष्टपैलू शैलीने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली आहे. त्याने श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत १७५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने दोन्ही डावात मिळून ९ विकेट घेतल्या आहेत. पहिल्या डावात त्याने ५ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ८७ धावा केल्या आहेत. १५० हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘चाहर फॅमिली’त लवकरच वाजणार सनई चौघडे, ‘या’ तारखेला राहुल प्रेयसीसंगे बांधणार लग्नगाठ
‘बाप’माणूस गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नासाठी झटलेली स्नेह राणा आता बनलीय टीम इंडियाची ‘संकटमोचक’
कोहलीचं ‘विराट’ मन! १०० व्या कसोटीनंतर विराटची दिव्यांग चाहत्याला जर्सी भेट, व्हिडिओनी जिंकली मने






