सर्व क्रिकेट चाहते इंडियन प्रीमिअर लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल २०२२चा पहिला सामना २६ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (KKR vs CSK) यांच्यात पार पडणार आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध लीग आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. असे अनेक भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली आहे. या लेखात आपण असे तीन गोलंदाज पाहणार आहोत, जे आयपीएलच्या इतिहासात संघाचे स्टार गोलंदाज होते. मात्र, हेच गोलंदाज आयपीएल आता २०२२ मध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसणार नाहीत.
१. अमित मिश्रा
आयपीएलमध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांचा नेहमीच दबदबा राहिला आहे. या यादीत पहिले नाव आयपीएलचा यशस्वी फिरकी गोलंदाज अमित मिश्राचे (Amit Mishra) आहे. अमित मिश्राने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा बहुतांश काळ भारतीय खेळपट्ट्यांवर घालवला आहे. त्याला येथील खेळपट्ट्यांची पूर्ण माहिती आहे. आयपीएलच्या इतिहासात भारतीय गोलंदाजांच्या यादीत मिश्राच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. फिरकीपटू मिश्राने आयपीएलमध्ये १५४ सामन्यांमध्ये २३.९७च्या सरासरीने आणि ७.३५च्या इकॉनॉमी रेटने १६६ विकेट्स घेतल्या आहेत. अमित मिश्राला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात कोणीच विकत घेतले नाही. त्यामुळे तो यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.
२. पीयुष चावला
भारतीय फिरकी गोलंदाज पीयुष चावला (Piyush Chawla) यावेळी आयपीएल २०२२मध्ये खेळताना दिसणार नाही. आयपीएलच्या मेगा लिलावात पीयुष चावलाला एकही खरेदीदार सापडलेला नाही. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून देखील त्याला मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पीयुषने १६५ आयपीएल सामन्यांमध्ये २७.३९च्या सरासरीने आणि ७.८८च्या इकॉनॉमी रेटने १५७ विकेट्स घेतल्या आहेत. पीयुष २००८ ते २०१३पर्यंत पंजाब किंग्सचा भाग होता. २०१४ ते २०१९पर्यंत तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता.
३. धवल कुलकर्णी
आयपीएलमधील वेगवान आणि स्विंग गोलंदाजीचे सर्वांनाच वेड आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) हा वेगवान गोलंदाज आहे. तो २०१७ मध्ये गुजरात लायन्स या नवीन आयपीएल संघाकडून खेळला आणि त्यानंतर २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्याला २०२०च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने विकत घेतले. धवलने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ९२ सामने खेळले असून ८.३१ च्या इकॉनॉमी रेटने एकूण ८६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये खेळताना दिसणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘सेहवाग मला भेटला, तर त्याला मी खूप मारेल’
भारताच्या ‘या’ ३ फलंदाजांचा नादच खुळा! वनडे कारकिर्दीत एकही गोलंदाज घेऊ शकला नाही त्यांची विकेट
‘माही’ची विकेट घेतल्यानंतर आता ‘या’ गोलंदाजाने केले विराट कोहलीला टार्गेट; म्हणाला…