यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत श्रीलंका, नामिबिया, यूएई, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज, आयर्लंड, स्कॉटलँड आणि नेदर्लंड यांच्याच शेवटच्या चार जागांसाठी संघर्ष पाहायला मिळाले. 22 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सुपर 12 फेरीचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदर्लंड यांच्यात खेळला जाईल. विश्वचषकापूर्वी सर्व खेळाडू चांगले प्रदर्शन करण्याच्या हेतूने स्वतःची फिटनेस सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काही खेळाडूंना दुखापतीमुळे विस्वचषकात खेळता येणार नाहीये. आपण या लेखात अशा तीन खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे दुखापतीमुळे विश्वचषकात खेळणार नाहीतच, पण त्यांनी याच कारणास्तव आयपीएल 2022 देखील खेळली नव्हती.
तीन खेळाडू ज्यांनी दुखापतीमुळे आयपीएल 2022 आणि आता टी-20 विश्वचषकातून माघार घेतली.
#3 दीपक चाहर (भारत)
फेब्रुवारी 2022 मध्ये भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिका खेळली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर चाहर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकला नाही. असे असले तरी, चाहत्यांना पूर्ण अपेक्षा होती की, चाहर आगामी आयपीएल हंगामात खेळेल. मात्र, चाहरने पुन्हा एकदा चाहत्यांची नाराशा केली. आयपीएलच्या मेगा लिलावात चाहरला तब्बल 14 कोटी रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले होते, पण तो या संघासाठी एकही सामना खेळू शकला नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅप करत असताना त्याच्या पाठिलाही दुखापत झाली.
पाठीला दुखापत झाल्याचे समजल्यानंतर त्याचे चाचणी केली गेली आणि दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. यातून सावरण्यासाठी त्याला किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. आयपीएलचा संपूर्ण हंगाम गमावल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतून मात्र त्याने संघात पुनरागमन केले. आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. निवडकर्त्यांनी चाहला टी-20 विश्वचषकात राखीव खेळाडूंमध्ये ठेवले होते, पण आता विश्वचषकातूनही त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात घेतले गेले होते, पण त्याआधी सराव करताना तो पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याचे सांगितले गेले होते. सध्या तो दुखापतीतून सावरण्यासाठी विश्रांतीवर असल्याचेही समजते.
#2 रविंद्र जडेजा (भारत) –
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू आहे, पण दुखापतीमुळे तो आगामी टी-20 विश्वचषक खेळत नाहीये. मागच्या महिन्यात पार पडलेल्या आशिया चषकात जडेजा भारतासाठी चांगेल प्रदर्शन करत होता, पण दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेत फक्त दोन सामने खेळता आले. त्यानंतर हा डावखुरा खेळाडू एडवेंचर एक्टिविटी करताना दुखापतग्रस्त झाल्याचे समजले. त्यानंतर जडेजाने या दुखापीतमुळे मोठी शस्त्रक्रियाही केली. याच कारणास्तव जडेजा आधी आशिया चषक आणि आता टी-20 विश्वचषकातूनही त्याला माघार घ्यावी लागली आहे. आयपीएल 2022 मध्ये जडेजा सीएसकेचा कर्णधार बनला होता, पण काही सामन्यांतर त्याने ही जबाबदारी सोडली आणि एकूण 10 सामनेच खेळू शकला. शेवटच्या सामन्यांमध्ये दुखापतीमुळे त्याला सीएसकेचे प्रतिनिधित्व करता आले नव्हते.
#1 जोफ्रा आर्चर (इंग्लंड) –
आयपीएल 2022 सुरू होण्याआधी झालेल्या मेगा लिलिवात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चर (Jofra Archer) ला 8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मुंबई संघ व्यवस्थापनाला आधी माहिती होते की, आर्चर दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाहीये. तरीही त्यांना पुढच्या हंगामाचा विचार करून या गोलंदाजावर मोठी रक्कम खर्च केली. आर्चर हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यावेळी मैदानातून मोठा काळ लांब होता. आयपीएलनंतर त्याने मैदानात पुनरागमन करण्यासाठी सराव सुरू केला, पण दुर्देवाने त्याच्या कोपऱ्याला झालेली दुखापत पुन्हा एकदा इजा पोहोचली. आता याच कारणास्तव तो पुढचे काही महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीये. आगामी टी-20 विश्वचषकातूनही त्याला याच कारणामुळे माघार घ्यावी लागली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पठ्ठ्याने 10 सामन्यात ठोकली 3 शतके अन् 5 अर्धशतके, तरीही टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद
‘बिग शो’ होईना! वर्ल्डकपच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाची वाढली डोकेदुखी; तुम्हीही पाहा आकडेवारी
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत दाखवून दिला आपला दम, ‘कॅप्टन’ बटलर मालिकावीर