---Advertisement---

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिग्गज असलेले ३ खेळाडू, जे नाही खेळू शकले जास्त कसोटी क्रिकेट

On: सोमवार, जुलै 20, 2020 9:46 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचे सर्वात वास्तविक आणि कठीण स्वरूप मानले जाते. कसोटी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावरच एखाद्या महान खेळाडूची महानता अनेकदा ठरवली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटला वेगळे महत्त्व आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी अनेक खेळाडूची इच्छा असते.

आजकाल टी२० क्रिकेटमुळे अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात येण्याची संधी मिळते.  पण कसोटी क्रिकेटमध्ये अशी संधी मिळतेच असं होत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूची उपयुक्तता आणि तंत्रशुद्धता दर्शवल्यानंतरच संघात स्थान मिळते. मात्र, घरगुती क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही काही खेळाडूंना कसोटी क्रिकेटसाठी राष्ट्रीय संघात संधी मिळत नाहीत. भारतीय खेळाडूंबरोबरही असे घडताना दिसले आहे.

असे काही खेळाडू आहेत ज्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे राजे समजले जाते. पण, त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये जास्त खेळण्याची संधी मिळत नाही. हे जगाच्या कानाकोपऱ्यात घडताना पाहिले जाऊ शकते.

अशाच मर्यादित क्रिकेटमध्ये आपले नाव कमावणाऱ्या परंतु कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरलेल्या खेळाडूंविषयी जाणून घेऊया.

१) युवराज सिंग

भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराजसिंगची कसोटी कारकीर्दही खूपच लहान राहिली. वनडे क्रिकेट आणि टी२० क्रिकेटमध्ये तुफानी पद्धतीने खेळलेला युवराज सिंग आपल्या कारकीर्दीत फक्त ४० कसोटी सामने खेळला.

युवराजने ३०४ वनडे सामन्यात ८,७०१ धावा व १११ बळी तसेच ५८ टी२० सामन्यात १,१७७ धावा आणि २८ बळी आपल्या नावे केले.

युवराज सिंगची कसोटी कारकीर्द ४० सामन्यांपुरती मर्यादित राहिली, या दरम्यान त्याने १९०० धावा केल्या, युवराज सिंगने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 3 शतके ठोकली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील मोठे नाव असूनही युवराज सिंग क्रिकेटच्या या दीर्घ स्वरुपात यशस्वी होऊ शकला नाही.

२) मायकल बेवन

ऑस्ट्रेलियाच्या वनडे क्रिकेटमधील मायकल बेवन मोठे नाव होते. मायकेल बेवन वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो. २३२ वनडे सामन्यात ६ हजाराहून अधिक धावा करणाऱ्या या फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नव्हती.

त्याने ऑस्ट्रेलियाकडून फक्त १८ कसोटी सामने खेळले. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत तीन अर्धशतकांसह शानदार पदार्पण करणाऱ्या बेवनला नंतर फारशी संधी मिळाली नाही. त्याने १८ कसोटी सामन्यात २९.१० च्या सरासरीने ७८५ धावा व २९ बळी मिळवले.

३) लसिथ मलिंगा

२००० नंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील गोलंदाजीचा निर्विवाद सम्राट असलेल्या लसिथ मलिंगाची कसोटी कारकीर्द फार काळ टिकली नाही.

२२६ वनडे व ८४ टी२० मध्ये अनुक्रमे ३३८, १०७ बळी मिळवले. ज्यामध्ये ५ हॅट्रिकचा समावेश आहे. मलिंगाने वनडे आणि टी२० मध्ये प्रत्येकी एकदा सलग चार चेंडूवर चार विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.

पण त्याने आपल्या कारकीर्दीत फक्त ३० कसोटी सामने खेळले. या दरम्यान मलिंगाने १०१ बळी घेतले. मर्यादित षटकांच्या क्रिकेट गाजवणाऱ्या मलिंगाला आपली कसोटी कारकीर्द मात्र लांबवता आली नाही.

वाचनीय लेख –

५ दिग्गज खेळाडू ज्यांनी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला वर्ल्डकप फायनलमध्ये

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

विक्रम जरी मोडण्यासाठी असले तरी हे ३ विक्रम मोडणे केवळ अशक्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---