पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. बांगलादेशने मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशसमोर विजयासाठी दुसऱ्या डावात फक्त 30 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी अगदी सहज गाठले. या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानने चार विशेषज्ञ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु खेळपट्टी फिरकीपटूंना उपयुक्त ठरली आणि त्यांची रणनीती फसली.
त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतात. ते तीन खेळाडू कोण असू शकतात ज्यांना दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाकिस्तान प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.
1.खुर्रम शहजाद-
वेगवान गोलंदाज खुर्रम शहजादला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी आणखी एका फिरकीपटूचा संघात समावेश केला जाऊ शकतो. खुर्रम शहजादने पहिल्या कसोटी सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटू आणण्यासाठी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
2.मोहम्मद अली
पाकिस्तान संघ आपला दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अलीलाही बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. संघात दुसरा फिरकीपटू आणण्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. मोहम्मद अलीने पहिल्या कसोटी सामन्यात 2 विकेट्स घेतल्या पण त्याला दुसऱ्या सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते.
3. बाबर आझम
या यादीत पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझमचे नाव पाहून तुम्हाला धक्का बसेल. मात्र, बाबर आझमने पहिल्या सामन्यात ज्या प्रकारची कामगिरी केली होती, ते पाहता त्याला वगळण्याची मागणी सर्वजण करत आहेत. बाबर आझमला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या डावात गरजेच्या वेळी त्याने केवळ 22 धावा केल्या. याशिवाय त्याचे क्षेत्ररक्षणही अत्यंत खराब होते आणि त्याने मुशफिकुर रहीमसारख्या फलंदाजाचा झेल सोडलेला.
हेही वाचा –
“माझ्या मुलाला निवृत्तीबद्दल समजले असेल”, निवृत्तीनंतर मुलगा जोरावरबद्दल शिखर धवन भावूक
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की