टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार आहे. अजूनही अनेक खेळाडूंच्या समावेशाबाबत संशय असला तरी अनेक वृत्तानुसार टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून बीसीसीआयकडून केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
भारतीय संघात अशा तीन खेळाडूंची निवड केली जाऊ शकते जे पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. या खेळाडूंमध्ये शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
शिवम दुबे
चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा स्फोटक फलंदाज शिवम दुबेची भारतीय संघात निवड जवळपास निश्चित असल्याचं बोललं जातंय. गेल्या दोन हंगामात त्यानं आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवम दुबेनं चालू हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात त्यानं 58.33 च्या सरासरीनं 350 धावा केल्या आहेत. या दरम्यान दुबेच्या बॅटमधून 24 चौकार आणि 26 षटकार निघाले आहेत.
यशस्वी जयस्वाल
यशस्वी जयस्वाल गेल्या काही काळापासून टीम इंडियाचा अविभाज्य भाग बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची छाप सोडल्यानंतर त्यानं आता टी-20 क्रिकेटमध्येही खळबळ उडवून दिली आहे. गेल्या आयपीएल हंगामाप्रमाणे यावेळी यशस्वीचा फॉर्म तेवढा चांगला नसला तरी गेल्या काही सामन्यांमध्ये त्यानं आपली क्षमता दाखवून दिली आहे. या काळात त्यानं एक शतकही ठोकलं आहे. जर त्याची टी-20 विश्वचषकात निवड झाली, तर तो भारतासाठी पहिल्यांदाच कोणत्यातरी मोठ्या स्पर्धेत भाग घेईल.
मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराजनं भारतासाठी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक खेळला आहे. मात्र अद्याप त्याला टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मोहम्मद सिराजचा आयपीएलमधील आतापर्यंतचा फॉर्म सरासरीचा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आणि टीम इंडियासाठी दमदार गोलंदाजीमुळे त्याची भारताच्या टी-20 संघात निवड होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला पहिली पसंती, पंत-राहुलला मिळणार डच्चू?
आयपीएल दरम्यानच टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार टीम इंडिया, तारीख आली समोर