---Advertisement---

कर्णधार कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडलाच पण मिस्बाह-उल-हकचाही विक्रम आहे धोक्यात

---Advertisement---

अँटिग्वा। भारतीय संघाने काल(25 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे.

विराटचा कसोटी कर्णधार म्हणून आशिया खंडाबाहेर मिळवलेला हा 7 विजय आहे. त्यामुळे तो आता आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या आशियाई कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने हा कारनामा करताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीने भारताचा कर्णधार म्हणून आशियाबाहेर 6 कसोटी विजय मिळवले आहेत.

त्याचबरोबर आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या आशियाई कर्णधारांच्या यादीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक आहे. मिस्बाहने आशिया खंडाबाहेर 8 कसोटी विजय मिळवले आहेत. मिस्बाहच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी विराट आता केवळ 1 विजय दूर आहे.

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे आशियाई कर्णधार – 

8 विजय – मिस्बाह-उल-हक

7 विजय – विराट कोहली

6 विजय – सौरव गांगुली

4 विजय – एमएस धोनी/ जावेद मियाँदाद/ वसिम अक्रम/ सलिम मलिक/ मुश्ताक मोहम्मद

क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहली ठरला परदेशात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार!

कर्णधार कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी

तब्बल ९६ वर्षांनंतर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये केला असा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment