---Advertisement---

आणि रोहित म्हणाला, ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक बनल्यानंतर मी…’

On: बुधवार, जून 17, 2020 3:45 PM
---Advertisement---

नवी दिल्ली । भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध १४० धावांची खेळी खेळून आता एक वर्ष झाले आहे. त्याने १६ जून २०१९ला पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. त्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला ३३६ धावांचे आव्हान दिले होते. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकात ३०२ धावांचे आव्हान मिळाले होते.

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव २१२ धावांत संपुष्टात आला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने तो सामना ८९ धावांनी जिंकला होता.

हा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला पाकिस्तानच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला ‘सध्या संघर्ष करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांना तू काय सल्ला देशील?’ जेणेकरून ते या संकटातून बाहेर पडतील. या प्रश्नाचे उत्तर देताना रोहितने मजेशीर गोष्ट बोलला होता. तो म्हणाला होता, “जर मी भविष्यात जेव्हाही पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनेल, तेव्हा नक्कीच याबद्दल सांगेल. आता मी कसे सांगू.”

रोहितने त्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ११३ चेंडूत ३ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने तब्बल १४० धावांची शतकी खेळी केली होती. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहून असे वाटत होते की तो लवकर द्विशतक ठोकतो की काय. परंतु डाव संपण्याच्या ७० चेंडूंपूर्वीच रोहितचा हसन अलीच्या चेंडूवर वहाब रियाजने झेल घेतला. भारताने वनडे विश्वचषक इतिहासात पाकिस्तानला पराभूत करण्याची ही सातवी वेळ होती.

ट्रेंडिंग घडामोडी-

-‘बीसीसीआयने आयपीएल २०२० च्या तारखा लवकर जाहीर कराव्यात’

-‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी

-बापरे! ८०पेक्षा जास्त सामने खेळून आयपीएलमध्ये एकही चौकार मारता न आलेले क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---