जगभरातील साथीच्या कोरोना विषाणूदरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 19 सप्टेंबरपासून युएईच्या 13 व्या सीझनचे आयोजन करणार आहे, परंतु जगातील सर्वात श्रीमंत फ्रँचायझी लीग अद्याप सुरू झालेली नाही, परंतु संघांना अनेक खेळाडूंनी या आयपीएलमधून माघार घेतल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. लीग सुरू होण्याच्या अवघ्या 15 दिवस आधी गमावलेल्या खेळाडूंच्या जागी इतर खेळाडू शोधणे आणि युएईमध्ये संघात सामील होण्यापूर्वी कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे अधिक कठीण होत आहे.
इंग्लंडचा खेळाडू अष्टपैलू बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघात अद्याप जोडला गेलाला नसला तरी तो देखील आयपीएल 2020 न खेळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी स्पर्धेतून नावे मागे घेतली आहेत. चला स्पर्धेतून नावे मागे घेतलेल्या 5 खेळाडू व त्यांची बदली खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
लसिथ मलिंगा
या यादीतील पहिले नाव श्रीलंकेचा महान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा यॉर्कर किंग, लसिथ मलिंगा आहे. त्यानी कौटुंबिक कारणे सांगून या मोसमात संघात सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सनेही त्याला समर्थन दिले असून ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसनला मलिंगाचा बदली खेळाडू म्हणून निवडले आहे. तो या आठवड्याच्या अखेरीस संघात दाखल होणार आहे.
सुरेश रैना
त्याचबरोबर अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला निरोप देणा्ऱ्या सुरेश रैना याचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट आहे, जो चेन्नई सुपर किंग्जच्या छावणीत कोरोना बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर या मोसमात न खेळण्याचा निर्णय घेत भारतात परतला. त्याने वैयक्तिक कारणाने हा निर्णय घेतला होता, असे सांगण्यात आले. त्यामुळे तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. असे असले तरी सीएसकेने अद्याप त्याचा बदली खेळाडू जाहीर केलेला नाही.
ख्रिस वॉक्स
त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने या हंगामात आयपीएलमध्ये भाग न घेण्याच्या यादीमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या नावाचादेखील समावेश आहे. वैयक्तिक कारणे सांगून त्याने आयपीएल 2020 मधून माघार घेतली आहे. त्याचबरोबर, दिल्ली कॅपिटल्स संघाने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एरिच नॉर्जला त्याच्याऐवजी संघात स्थान दिले आहे.
हरभजन सिंग
चेन्नई सुपर किंग्जचे दोन सर्वात ज्येष्ठ खेळाडू सुरेश रैना आणि त्यानंतर हरभजन सिंग यांनी आयपीएल २०२० मधून माघार घेतली आहे. यामुळे केवळ फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीवरही परिणाम होईल. हरभजनने ट्विट करुन तो वैयक्तिक कारणाने यावेळेस खेळणार नसल्याचे सांगितले आहे. चेन्नईनेही त्याला सहकार्य केले असून अजून त्याचा बदली खेळाडू निवडलेला नाही.
जेसन रॉय
या यादीतील शेवटचे नाव म्हणजे इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय, जो दिल्ली कॅपिटल्स संघात खेळत होता. दुखापतीमुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या टी -20 मालिकेमधूनही बाहेर पडला होता, त्यानंतर रॉयने आयपीएल 2020 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेत हंगामातून माघार घेतली. त्याच्याजागी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने डॅनियल सॅम्स ला संधी दिली आहे.
केन रिचर्डसन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून यावेळी खेळणार असलेल्या केन रिचर्डसनने देखील या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. त्याच्या मुलाचा जन्म लवकरच होणार असल्याने त्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे बेंगलोर संघाने त्याला सहकार्य दर्शवले आहे. त्याच्या ऐवजी विराट कोहली कर्णधार असलेल्या बेंगलोर संघात ऍडम झम्पाचा समावेश झाला आहे.
हॅरी गुर्नी
इंग्लंडचा गोलंदाज हॅरी गुर्नी खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2020मधून बाहेर पडला आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार होता. त्याला कोलकाताने यावर्षीसाठी संघात कायम केले होते. पण आता तो बाहेर पडला असून अजून कोलकाताने त्याचा बदली खेळाडू म्हणून कोणाचीही निवड केलेली नाही.
ट्रेंडिंग लेख-
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत
महत्त्वाच्या बातम्या-
६ षटकार ठोकत सिमन्सने केल्या ९६ धावा, नाईट रायडर्सने मिळविला सलग ८ वा विजय
धोनीला क्रिकेटचे धडे देणाऱ्या या मार्गदर्शकाच्या स्थितीत सुधारणा, ५ दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर
आयपीएलमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जॉन्टी र्होड्सने केली ‘ही’ विशेष मागणी