ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षा टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असून २३ ऑक्टोबर रोजी या दोन संघात सामना होणार आहे. दरम्यान, या सामन्याच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. हायवोल्टेज सामन्यांमध्ये गणना होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष असते. दरम्यान, या सामन्याची ६० हजार तिकिटे विकली गेली आहेत.
गेल्यावर्षी म्हणेच २०२१ साली झालेल्या टी२० विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. हा विश्वचषकातील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा पहिलाच पराभव होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन संघ टी२० विश्वचषकात आमने-सामने असणार आहेत.
भारत-पाकिस्तान संघांमध्ये २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सामना होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांनी मोठी उत्सुकता दाखवली आहे. स्टेडियमची क्षमता सुमारे १ लाख आहे. अशा परिस्थितीत हे स्टेडियम पूर्ण भरण्याची अपेक्षा आहे. आयसीसीने सुरुवातीला या स्टेडियममधील केवळ ६० हजार तिकिटेच विकली आहेत, कारण कोरोना विषाणूच्या साथीमुळे प्रेक्षकांची क्षमता कमी करण्यात आली आहे. तरी किमान ६० हजार लोकांना प्रवेश मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी विकलेल्या आलेल्या ६० हजार तिकिटांची फक्त ४ तासात विक्री झाली आहे.
तसेच आयसीसीने वेटिंग यादीच्या आधारे काही चाहत्यांना तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चाहत्यांना एक लाख रुपये एवढा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अंडर १९ संघातील खेळाडू भविष्यात हिट होण्यासाठी बीसीसीआयचा ‘मास्टरप्लॅन’, एकदा पाहाच
हैदराबादला रोखून मोहन बागान ‘टॉप फोर’मध्ये परतण्यास उत्सुक
राहुल द्रविड स्वतः गोलंदाजी करण्यासाठी उतरला मैदानात, बीसीसीआयने अशी उडवली खिल्ली