राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रविवारी (२७ सप्टेंबर) पार पडलेला आयपीएल २०२०चा नववा सामना खूप रोमांचक ठरला. या सामन्यात राजस्थान संघाने दमदार प्रदर्शन करत ४ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान पूर्ण सामन्यात चौकार-षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला.
पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात २ विकेट्स गमावत २२३ धावांचा भलामोठा स्कोर उभा केला. पंजाबच्या या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघानेही दमदार फलंदाजी केली आणि ३ चेंडू राखून ४ विकेट्सने सामना जिंकला.
राजस्थानच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने मोलाचा वाटा उचलला. सॅमसनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत केवळ ४२ चेंडूत ८५ धावांची तूफानी खेळी केली. दरम्यान त्याने २०२.३८च्या स्ट्राईक रेटने एक-दोन नव्हे तर तब्बल ७ षटकार मारले. यासह त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सॅमसन आयपीएल सामन्यातील एका डावात सर्वाधिकवेळा ७ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यापुर्वी सॅमसनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ३ वेळा एका डावात ७ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्याच्याव्यतिरिक्त रिषभ पंत आणि आंद्रे रसेल हे या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर एबी डिविलियर्सने आतापर्यंत ५ वेळा आणि ख्रिस गेलने १४ वेळा हा पराक्रम केला आहे.
२०१३ साली आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या सॅमसनने आतापर्यंत एकूण ९५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २८.८८च्या सरासरीने २३६८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने १०५ षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-हार्दिक पंड्या कधी करणार गोलंदाजी? पाहा झहीर खानने काय सांगितले
-राजस्थानविरुद्ध चौफेर फटकेबाजी करत ‘हा’ अवलिया झाला दूसऱ्या स्थानी विराजमान, वाचा सविस्तर
-‘राजस्थान विरूद्ध पंजाब’ सामना आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, कारणंही आहे तसंच
ट्रेंडिंग लेख-
-असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज
-असे २ भारतीय फलंदाज, ज्यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधीच आयपीएलमध्ये ठोकलेत सर्वाधिक अर्धशतके
-जेसन होल्डर ४ वर्षांनी उतरणार आयपीएलच्या मैदानात, जाणून घ्या त्याच्याबद्दल ३ खास गोष्टी






