वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (21 ऑक्टोबर) दुसरा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. हेन्रिक क्लासेन याने झळकावलेल्या तुफानी शतकासह रिझा हेंड्रिक्स, रासी वॅन डर डसेन व मार्को जेन्सन यांनी झळकावलेल्या अर्धशतकांमुळे तब्बल 399 धावा उभ्या केल्या.
🇿🇦A spirited effort from the Proteas to get a total of 399/7. Heinrich Klaasen with a brilliant display 109 runs 🏏
🏴England will need 400 to win #CWC23 #BePartOfIt pic.twitter.com/2OsM7qz0gP
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 21, 2023
नियमित कर्णधार टेंबा बवुमा याच्या अनुपस्थितीत उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्याच चेंडूवर डीकॉक याच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी रिझा हेंड्रिक्स व रासी वॅन डर डसेन यांनी शतकी भागीदारी रचली. रिझाने 85 तर डसेनने 60 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार म्हणून खेळत असलेल्या ऐडन मार्करम याने 42 धावांचे योगदान दिले. डेव्हिड मिलर अपयशी ठरल्याने दक्षिण आफ्रिका संघाची मदार हेन्रिक क्लासेन व मार्को जेन्सन यांच्यावर होती.
दोघांनी सुरुवातीला सावध खेळ केल्यानंतर अक्षरशः इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणले. त्यांनी दीड शतकी भागीदारी रचली. क्लासेनने आपल्या विश्वचषक कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना 97 चेंडू 109 धावा केल्या. त्याने बारा चौकार व चार षटकार लगावले. दुसऱ्या बाजूने जेन्सनने 42 चेंडूवर नाबाद 75 धावा काढल्या. अखेरच्या षटकात केवळ पाच धावा निघाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वासघात दुसऱ्यांदा चारशे धावांचा टप्पा पार करण्यात अपयशी ठरला.
(South Africa Post 399 Against England Klaseen Hits Century Jansen Reeza Dussen Hits Fifty)