टोकियो पॅरालंपिक स्पर्धेचा थरार सध्या जपानची राजधानी टोकियो येथे सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू जबदरस्त कामगिरी करत आहेत. रविवारी (२९ ऑगस्ट ) भारताला ३ पदकं मिळाली होती. तर सोमवारी (३० ऑगस्ट) देखील पॅरा नेमबाज अवनी लेखरा हीने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते. हे टोकियो पॅरालंपिक स्पर्धेतील भारताचे पहिलेच सुवर्णपदक होते. या ऐतिहासिक कामगिरीनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील तिला खास बक्षीस जाहीर केले आहे.
अवनी लेखराने महिलांच्या १० मीटर एयर रायफल स्टँडिंग एसएच१ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. हे यश मिळवल्यानंतर चहूबाजूंनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी तिला, खास अपंग व्यक्तींसाठी बनवण्यात आलेली एसयूव्ही गाडी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लिहिले की,”एक आठवड्यापूर्वी दीपा मलिकने मला सुचवले होते की, आम्ही देखील अपंग व्यक्तींना सोईस्कर होईल अशी एसयूव्ही गाडी विकसित करावी, जशी ती टोकियोमध्ये वापरत आहे. त्यानंतर मी माझा सहकारी वेलुला हे आव्हान दिले आणि त्याने ते आव्हान स्वीकारले. ही भेट मी अवनी लेखराला देऊ इच्छितो.”
(Anand Mahindra special gift to golden girl avani lekhara)
A week ago @DeepaAthlete suggested that we develop SUV’s for those with disabilities. Like the one she uses in Tokyo.I requested my colleague Velu, who heads Development to rise to that challenge. Well, Velu, I’d like to dedicate & gift the first one you make to #AvaniLekhara https://t.co/J6arVWxgSA
— anand mahindra (@anandmahindra) August 30, 2021
Impressed with this technology.Sincerely hope Automobile world in India can give us this dignity and comfort.. I love to drive big SUVs but getting in and out is a challenge, Give me this seat n I buy your SUV @anandmahindra @TataCompanies @RNTata2000 @MGMotorIn #Tokyo2020 pic.twitter.com/0yFGwvl46V
— Deepa Malik PLY (@DeepaAthlete) August 20, 2021
दीपा मलिकने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती अपंग व्यक्तींसाठी सोईस्कर अशा कारमध्ये बसताना दिसून आली होती.या ट्विटवर कॅप्शन देत तिने भारतातही अशी एसयूव्ही कार असायला हवी अशी मागणी केली होती. या ट्विटमध्ये तिने आनंद महिंद्रा, रतन टाटा आणि एमजी मोटर्सला टॅग केले होते.
यापूर्वी देखील आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना थार एसयूव्ही गाडीत भेट म्हणून दिली होती. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्रालादेखील महिंद्रा यांनी XUV 700 कार भेट दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने ‘कांस्यपदका’ला घातली गवसणी
अखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, ‘या’ संघात झाले सामील