आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी सर्व संघांनी लिलावापूर्वी, बुधवारी (20 जानेवारी) आपल्या संघातील काही खेळाडूंना मुक्त केले. तर काही खेळाडूंना यंदाच्या हंगामासाठी संघात कायम ठेवले. त्याचबरोबर आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचे माजी सलामी फलंदाज आकाश चोप्राने लिलावात कोणते खेळाडू महाग ठरू शकतात याबाबत भविष्यवाणी केली आहे.
भारतीय संघाचे माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणाले, आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी होणार्या लिलावात ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला सर्वात जास्त किमतीने खरेदी केले जावू शकते. मिचेल स्टार्क हा आयपीएल 2020 मध्ये सहभागी झाला नव्हता. त्याचबरोबर आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात पार पडेल.
त्यानंतर आकाश चोप्रा यांनी सांगितले की, अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान, ज्याला किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून मुक्त करण्यात आले आहे. त्याला या लिलावात जवळपास 7 किंवा 8 कोटी रुपयेमध्ये खरेदी केले जावू शकते. त्याचबरोबर आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा भाग असणारा जेसन रॉय याला दिल्ली कॅपिटल संघाने मुक्त केले आहे. त्यामुळे त्याला सुद्धा यंदाच्या लिलावात 4 ते 6 कोटी रुपयेमध्ये खरेदी केले जावू शकते.
ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने बुधवारी रिलीज केले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाने कुल्टर-नाईल याला रिलीज केले आहे. त्यामुळे आकाश चोप्रा यांचे मत आहे की, या दोघांना सुद्धा यंदाच्या लिलावात चांगले मानधन देऊन खरेदी केले जाईल.
माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनी ऑस्ट्रेलिया अष्टपैलू खेळाडू कॅमरॉन ग्रीन आणि न्यूझीलंड संघाचा 6 फूट 7 इंच उंचीचा कायली जेमिसन या दोघांच्या आयपीएल भविष्याबद्दल खूप विश्वास व्यक्त केला आहे. आकाश चोप्रा म्हणाले, “जेमिसन याला 5-7 कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर 5-6 कोटी रुपयेला कॅमेरामन ग्रीनला सुद्धा खरेदी केला जावू शकतो.” त्यामुळे पुढील महिन्यात होणार्या लिलावात आकाश चोप्रा यांच्या किती भविष्यवाणी बरोबर ठरतात.
तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या हंगामासाठी हरभजन सिंग याला मुक्त केले आहे. त्याचबरोबर डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला आपल्या संघात कायम ठेवले आहे. हे दोघे ही मागील हंगामात सहभागी झाले नव्हते. मुंबई इंडियन्स संघाकडून लसिथ मलिंगाने फ्रेंचायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने स्टीव्ह स्मिथला डच्चू दिला आहे. त्याच्याजागी राजस्थान रॉयल्स संघाची कमान संजू सॅमसनच्या हाती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू, ‘या’ दिग्गजांना टाकले मागे
“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया
आयपीएल २०२१ – खेळाडूंना मुक्त केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक, घ्या जाणून