पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नुकतेच केलेल्या एका ट्विटवर इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पिटरसनने त्याला गमतीने ट्रोल केले आहे.
सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या २०१९ विश्वचषकात पाकिस्तानला त्यांच्या पहिल्या सामन्यात विंडीजविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या पराभवानंतर शोएबने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक प्रेरणा देणारे ट्विट केले होते.
या ट्विटमध्ये त्याने तो पाकिस्तानकडून खेळत असतानाच्या दिवसांतील पिटरसनला बाद केल्यानंतरचा एक फोटोही शेअर केला होता.
तसेच त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘रक्त, घाम, आक्रमकता, हृदयाची धडधड, बदमाशी या सर्वांची तूम्ही जेव्हा देशाचे प्रतिनिधित्व करत असता तेव्हा गरज असते. तूमच्या छातीवर असणारा स्टार ही गर्वाची गोष्ट आहे. तगडे खेळा. लढा.’
Blood, sweat, aggression, racing heartbeat, badmaashi. This is whats required when you represent your country. This star on your chest is your pride guys. Tagra khelo.
Go get them. Larr jao. #Pakistan #PakvsEng #cwc2019 pic.twitter.com/b9JnTmBKOp— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 1, 2019
शोएबच्या या ट्विटवर पिटरसनने मजेशीर उत्तर दिले आहे. पिटरसनने म्हटले आहे की ‘तूझ्या ट्विटवर वाद करु शकत नाही, मी सगळीकडे फटके मारत शतक केल्यानंतर तू सेलिब्रेशन करत होता. ग्रेट पॅशन’
https://twitter.com/KP24/status/1134878232292016128
पिटरसनच्या या ट्विटनंतर काहीवेळातच शोएबनेही त्याला उत्तर दिले आहे. शोएबने म्हटले, ‘मित्रा तू शानदार फलंदाज आहेस. पण मला त्यावेळी तूला बाद केल्यानंतर मी केलेला चिकन डान्स आवडतो.’
Mate you were a true force to reckon with but loved my chicken dance after getting u out ..🕺🏻
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 1, 2019
शोएबच्या या ट्विटनंतर एका चाहत्याने शोएबने पिटरसनला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना केलेल्या चिकन डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पिटरसन आणि शोएब हे मैदानात जरी प्रतिद्वंदी होते, तरी ते मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत.
Here it is, The chicken dance.😄
Lols pic.twitter.com/p5s4FmjAfS— Hamid Khan (@Engr_Hamid1992) June 1, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–दक्षिण आफ्रिकेचा हा गोलंदाज म्हणतो विराट कोहली ‘अपरिपक्व’…
–विश्वचषक २०१९: टीम इंडियाला पहिल्याच सामन्याआधी बसला जोरदार धक्का
–श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने केला मोठा पराक्रम