भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा दिवसेंदिवस महान खेळाडूच्या दिशेने प्रवास करत आहे. विशेष म्हणजे विराट या प्रवासात रोज नवनवीन विक्रमांचा रतीब घालत आहे. गेले काही महिने विराटसाठी अतिशय खराब गेले आहे. विशेष करुन सांगायचे झाले तर न्यूझीलंड दौरा.
न्यूझीलंड दौऱ्यात विराटला केवळ 218चं धावा करता आल्या. यामुळे विक्रमांना एकप्रकारे खिळचं बसली. असे असले तरी विराटसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका तसेच विश्व 11 विरुद्ध आशिया 11 ही मालिका पुन्हा लयीत परतण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती.
परंतु कोरोना व्हायरसमुळे या दोनही मालिका रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोनही मालिकांत चांगल्या धावा करण्याची विराटला संधी होती. तसेच कोरोना व्हायरसमुळे पुढील किती आंतरराष्ट्रीय मालिका रद्द होतील याची कोणतीही माहिती सध्यातरी नाही. एका क्रिकेटरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून तीन-चार महिने दुर रहाणे हा खूप मोठा काळ होतो. यामुळे विराट सचिनचा जो विक्रमांचा पाठलाग करत आहे त्यातही वनडेतील विक्रम यांना एकप्रकारची खिळ बसली आहे.
कशी आहे दोघांचीही वनडे कारकिर्द-
सचिनने वनडेत ४६३ सामन्यात ४५२ डावांत फलंदाजी करताना ४४.८३च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. यात ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे.
दुसऱ्या बाजूला विराटने २४८ सामन्यात २३९ डावांत फलंदाजी करताना ५९.३४ च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. यात ४३ शतके आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे.
सचिनचा वनडेतील 49 शतकांचा विक्रम याचवर्षी मोडण्याची विराटला नामी संधी चालून आली होती. परंतु न्यूझीलंडमधील अपयश व कोरोनामुळे रद्द झालेल्या मालिकांमुळे हा विक्रम एकप्रकारे लांबणीवर पडला आहे.
आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमासाठीही करावी लागणार प्रतिक्षा-
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतके केली असून या यादीत रिकी पाॅटींग 71 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर विराट 70 शतकांसह तिसऱ्या स्थानी. विराटला या यादीत दुसऱ्या स्थानी येण्याची मोठी संधी होती. परंतु हा विक्रमही आता लांबणीवर पडला आहे.
ट्रेडिंग बातम्या-
– कारणंही तशीच होती; इतिहासात भारतातील केवळ ३ वनडे मालिका रद्द झाल्या आहेत
– टीम इंडियाचा हा शिलेदार करणार टी20मध्ये दणदणीत द्विशतक
– संजय मांजरेकरांच्या हाकलपट्टीचं खरं कारण आलं समोर
– टाॅप ५: मांजरेकरांसह इतिहासात हाकालपट्टी झालेले ५ समालोचक