क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये प्ले-ऑफस मधील क्वालीफायर 2 चा पराभूत मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघ विरुद्ध एलिमीनेटर 2 चा विजयी राहिलेला नाशिक द्वारका डिफेंडर्स संघ यांच्यात एलिमीनेटर 4 चा सामना झाला. सामन्याची सुरुवात संथ झालेली. पाच मिनिटांनंतर 5-4 अशी नाशिक संघाकडे आघाडी होती. त्यानंतर आकाश शिंदेने चपळ चढायां करत गुण टिपले व सातव्या मिनिटाला नाशिक संघांने मुंबई उपनगर संघावर लोन पाडला.
मध्यांतराला नाशिक संघाकडे 21-12 अशी आघाडी होती. मध्यांतरा नंतर नाशिक संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन दाखवले. आकाश शिंदेने आपल्या संघाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देत संघाला खेळवत होता. आकाश शिंदे संघात असल्यावर नाशिक संघात वेगळाच आत्मविश्वास बघायला मिळतो. नाशिक संघाने संपूर्ण सामन्यात मुंबई उपनगर संघाला चार वेळा ऑल आऊट सामना एकतर्फी जिंकला.
नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाने 47-20 असा मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर विजय मिळवला. नाशिक संघाकडून आकाश शिंदे ने 13 गुण मिळवले. तर शिवकुमार बोरगोडे ने चढाईत 5 तर पकडीत 4 गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला. ओंकार पोकळे ने 5 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. मुंबई उपनगर संघाकडून शुभम दिडवाघ ने 9 गुण मिळवले. (Eliminator 4 – Nashik Dwarka Defenders beat Mumbai Suburban)
बेस्ट रेडर- आकाश शिंदे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
बेस्ट डिफेंडर- ओंकार पोकळे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
कबड्डी का कमाल- शिवकुमार बोरगोडे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अथर्व तायडेची खेळी व्यर्थ, आयपीएलची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या गाठताना पंजाब 201 धावांवर सर्वबाद
एलिमीनेटर 3 – ठाणे हम्पी हिरोज संघाची पालघर संघावर मात, पालघर संघाचे आव्हान संपुष्टात