दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर लीग क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मझांसी सुपर लीगमध्ये खेळल्यावर त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्येही (पीएसएल) खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
डिव्हीलियर्स पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स या संघाकडून खेळणार आहे. यासाठी तो पाकिस्तानमध्ये जाणार असून लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळणार आहे.
“मला सांगण्यास खुप आनंद होत आहे की मी पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्सकडून 9 आणि 10 मार्चला घरच्या मैदानावर खेळणार आहे”, असे डिव्हीलियर्सने या लीगच्या अधिकृत वेबसाइटवर सांगितले आहे.
“गद्दाफी स्टेडियमवर पुन्हा खेळण्यास मी उत्सुक आहे”, असेही डिव्हीलियर्सने म्हटले आहे.
A special message from our mentor and player @ABdeVilliers17
“Main Lahore A Raha Hun” 🤩#DamaDamMast #MainHoonQalandar pic.twitter.com/Ye8j65Jwxl— Lahore Qalandars (@lahoreqalandars) January 14, 2019
पाकिस्तानमध्ये सध्या क्रिकेट पुन्हा रूजवायचे असून डिव्हीलियर्सच्या येण्याने त्यांना मदतच होणार आहे. 2017मध्ये या देशात विश्व एकादश आणि पाकिस्तान यांच्यात तीन टी20 सामने झाले होते. यानंतर विंडीज, झिम्बाब्वे आणि श्रीलंका या संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे.
यंदाच्या पीएसएलमधील बहुतांश सामने अरब अमिरातीमध्ये होणार आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डने काही सामने पाकिस्तानमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या लीगच्या मागील हंगामातील दोन एलिमीनेटर्स आणि अंतिम सामना पाकिस्तानमध्येच खेळवला गेला होता. तर यावर्षी लाहोर आणि कराची या संघांचे मिळून शक्यतो आठ सामने पाकिस्तानमध्ये खेळवणार आहे.
कलंदर्स त्यांचे दोन सामने घरच्या मैदानावर खेळणार आहेत. डिव्हीलियर्सने 2007मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी तो पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–एएफसी आशियाई करंडक- बहरिन विरुद्धचा सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा
–त्या ६२ धावा हिटमॅन रोहितचे नाव कांगारुंच्या भूमीत सुवर्णाक्षरांनी लिहीणार
–Video: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊटचा किस्सा पहाच