इंडियन प्रीमियर लीग ही जगभरातील सर्वात मोठी लीग २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व संघ सध्या आयपीएलची तयारी करत आहेत. आयपीएलची ट्राॅफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने सुद्धा या वर्षीचे आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्सच्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडूलकरला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) प्रशिक्षकांपासून खेळाडूंपर्यंत सर्वजण आयपीएलचे (IPL 2022) विजेतेपद जिंकण्यासाठी नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत. या दरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेसाठी जियो वर्ल्ड गार्डनमध्ये एमआय अरेना तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याला रोहित शर्मा (Rohit Sharma) काही प्रश्न विचारताना दिसत आहे.
रोहित अर्जुनची ओळख करुन देताना म्हणाला की, ‘द वन एंड ओनली अर्जुन तेंडूलकर’. यानंतर भारतीय कर्णधाराने त्याला त्याच्या कूटुंबाबद्दल विचारले आणि त्याची बहीन सारा तेंडूलकर(Sara Tendulkar) बद्दल विचारले असता, तो म्हणाला की ती लंडनमध्ये आहे. या व्हिडीओत मुंबई संघाचे इतर खेळाडू म्हणजेच कायरन पालार्ड, इशान किशन, जसप्रीत बुमराह हे सुद्धा मस्ती करताना दिसत आहेत.
आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई संघ आपला पहिला सामना २७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळणार आहे. या हंगामात आयपीएलचे स्वरुप बदलले असून मुंबई संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. तसेच अ गटात कोलकाता नाइट राइडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जाएंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघाचा सुद्धा समावेश आहे. या संघासोबत मुंबई संघ दोन-दोन सामने खेळताना दिसणार आहे.
आयपीएल २०२२ साठी मुंबई संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, मयंक मार्कडेय, एन तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डेनियल सेम्स, टायमल मिल्स, टिम डेविड, राइली मेरेडिथ, मोहम्मद अरशद खान, अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, राहुल बुद्धि, ऋतिक शॅाकीन, अर्जुन तेंदुलकर, फेबियन एलेन आणि आर्यन जुयाल.
महत्त्वाच्या बातम्या-
फाफ डू प्लेसिस सर्वात ‘स्वस्त’, तर ‘हा’ खेळाडू बनला आयपीएल १५मधील सर्वात महागडा कर्णधार, घ्या जाणून
महिला विश्वचषकात भारतासाठी ‘करा किंवा मरा’ सामना; बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय