या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना पार पडला. पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. हा सामना इंग्लंडने 74 धावांनी आपल्या नावावर केला. मात्र, 76व्या षटकात जॅक लीच याच्या चेंडूवर आघा सलमान याला टीव्ही पंचांनी चुकीच्या पद्धतीने नाबाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. टीव्ही पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरल्याने नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.
झाले असे की, पाकिस्तान संघाच्या डावाच्या 76व्या षटकात जॅक लीच गोलंदाजी करत होता. यादरम्यान शेवटच्या चेंडूवर आगा सलमान याने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो शॉट चुकला आणि चेंडू त्याच्या शरीरावर जाऊन लागला. जॅकने पायचीतसाठी अपील केली, त्यानंतर मैदानातील पंचांनी त्याला बाद दिले. मात्र, सलमाानने डीआरएस घेतला. टीव्ही रिप्लेनुसार चेंडू यष्टीच्या वर होता आणि फलंदाजाला नाबाद घोषित करण्यात आले. मात्र, या उसळी चेंडूने सर्वांना हैराण केले. सलमान या जीवदानाचा फायदा उचलण्यात अपयशी ठरला. त्याला फक्त 30 धावाच करता आल्या आणि तो रॉबिन्सनच्या चेंडूवर पायचीत होऊन तंबूत परतला.
समालोचकांनीही या घटनेला अविश्वसनीय म्हटले. तसेच, कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्यासह इतर खेळाडूही हैराण असल्याचे दिसले. सोशल मीडियावरही नेटकरी टीव्ही पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, “हा चेंडू स्टंप कसा काय चुकवू शकतो? ही चीटिंग आहे.”
How in this world could that miss the stumps??!😬 Good manipulation.👏 But it's not something new we are seeing from a home team.🙂 CHEATING 👎 pic.twitter.com/M4MBhLuZgq
— Khush (@JalsaKaroYaar) December 5, 2022
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “लवकरच जॅक लीच आणि ऑली पोप यांना पीएसएलचा कॉन्ट्रॅक्ट मिळेल.”
https://twitter.com/TheFlamingoShot/status/1599703700607754240?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1599703700607754240%7Ctwgr%5E923a4f3941ec264c3caa75a78e735be5ec0e93fd%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fwatch-video-controversial-tv-umpire-decision-in-pakistan-england-first-test-match-1056037
या सामन्यात विजय मिळवत इंग्लंड संघाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला 9 डिसेंबरपासून मुलतान येथे सुरुवात होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महत्त्वाच्या संघाची घोषणा! अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, तर सूर्याही ताफ्यात सामील
जबाबदारी वाढल्याने जयवर्धनेने सोडले चॅम्पियन संघाचे प्रशिक्षकपद; आता दिसणार या भूमिकेत