इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजचा तडाखेबाज यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन हा लिलावातील चौथा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसेच, आयपीएल इतिहासातील वेस्ट इंडीजचा सर्वात महागडा खेळाडू देखील तो बनला.
पूरनसाठी रंगली चुरस
आयपीएलमधील बहुतांशी संघांना यष्टीरक्षक फलंदाज हवा होता. क्विंटन डी काॅक, दिनेश कार्तिक, ईशान किशन व जॉनी बेअरस्टो या सर्वांना कोट्यवधींची बोली लागली. लॉटमधील अखेरचा आंतरराष्ट्रीय यष्टीरक्षक निकोलस पूरन याच्यासाठी सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स हे संघ चांगलेच झुंजले. अखेरीस केन विलियम्सनच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद संघाने तब्बल १० कोटी ७५ लाख रुपयांची तगडी बोली लावत त्याला खरेदी केले. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्वाच्या बातम्या-