भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना रविवारी (29 जानेवारी) लखनऊमध्ये खेळला गेला. उभय संघांतील हा सामना भारताने 6 विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादव याने चौकार मारल्यामुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. या अतितटिच्या सामन्यात विजय मिलवल्यानंतर सूर्यकुमारचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला. व्हिडिओत त्याच्यासोबत युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव देखील दिसत आहे.
भारत आणि न्यूझीलंड (INDVNZ) यांच्यातील या दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला 100 धावांचा टप्पा देखील पार करता आला नाही. भारताला विजयासाठी 100 धावांचे लक्ष्य मिळाले. सुरुवातील हे लक्ष्य सोपे वाटत असले, तरी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ते अवघड बनवले. सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडने शेवटच्या षटकापर्यंत प्रयत्न केला, पण अखेर त्यांना हार पत्करावी लागली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 31 चेंडूत 26 धावांची खेळी केली आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी बीसीसीआय टीव्हीवर चर्चा केली. यावेळी चहलने सूर्यकुमारला त्याला मिळालेल्या यशाविषयी प्रश्न विचारला. त्यानंतर सूर्यकुमारने जे उत्तर दिले, ते ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला, “युझवेंद्र चहलने मागच्या हंगामात मला जो सल्ला दिला, मी तो ऐकला. मला त्याच्याकडून अजून काही गोष्टी शिकायच्या आहेत. तो माझा फलंदाजी प्रशिक्षक आहे.”
Local lad 😊
Landmark holder 👏
The ever-so-adaptable Mr. 360 👍Laughter, insights & banter unfold as @yuzi_chahal hosts @imkuldeep18 & @surya_14kumar on Chahal TV 📺 in Lucknow 👌 👌 – By @ameyatilak
Full interview 🎥 🔽 #TeamIndia | #INDvNZ https://t.co/5THSbQ4Epi pic.twitter.com/Ic9C32lafm
— BCCI (@BCCI) January 30, 2023
परिस्थितीनुसार स्वतःच्या खेळीत बदल करणे गरजेचे – सूर्यकुमार यादव
तत्पूर्वी सामना संपल्यानंतर मॅच प्रेजेंटेशनवेळी सूर्यकुमार म्हणाला, “आज मैदानात एक वेगळाच सूर्यकुमार यादव होता. परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे गरजेचे होते. जेव्हा मी फलंदाजीला आलो, तेव्हा हाच विचार करत होतो की, स्वतःला परिस्थितीनुसार बदलायचे आहे. वॉशिंगटन सुंदर बाद झाल्यानंतर कोणीतीर शेवटपर्यंत खेळपट्टीवर फलंदाजी करणे गरजेचे होते.” दरम्यान, सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या () याने खेळपट्टीविषयी नाराजी बोलून दाखवली. हार्दिक सूर्यकुमारच्या साथीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता आणि त्याने 20 चेंडूत 15 धावांची खेळी केली. न्यूझीलंड आणि भारताच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा पार करता आला नाही. (A funny video of Suryakumar Yadav and Yuzvendra Chahal after the second T20 match is going viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला क्रिकेटपटू पार्श्वीने पहिल्या प्रेमासाठी केला त्याग; क्रिकेटर नव्हे तर…
सेव्हन अ साईड फुटबॉल | कॉन्स्टलेशन चिताज संघाला दोन गटात विजेतेपद; मार्व्हल्स, स्ट्रायकर्स, पॅंथर्स अन्य गटात विजेते