बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पराभवानंतर बीसीसीआय टीम इंडियाच्या कामगिरीवर अजिबात खूश नाही. या कारणास्तव आता संघाबाबत कठोर निर्णय घेतले जात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 1-3 पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्वत्र गोंधळ उडाला आहे. म्हणूनच बीसीसीआयने काल शनिवारी मुंबईत एक आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एक निर्णय असाही घेण्यात आला आहे, जो विराट कोहली आणि रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना धक्का देऊ शकतो.
खरंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टी20 विश्वचषकानंतर या दोन्ही खेळाडूंनी या फॉरमॅटला अलविदा म्हटले. आता हे खेळाडू फक्त एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये खेळतात. आतापर्यंत असे व्हायचे की अनेक वरिष्ठ खेळाडू स्वतः ठरवत असत की त्यांना कोणत्या मालिकेत खेळायचे आहे आणि कोणत्या मालिकेत खेळायचे नाही. अनेक वेळा वरिष्ठ खेळाडूंनी स्वतःच्या मर्जीने टी20 किंवा एकदिवसीय मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
आता बीसीसीआयने हे रोखण्यासाठी तयारी केली आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की खेळाडूंना आता कोणत्या मालिकेत खेळायचे किंवा नाही हे स्वतः ठरवण्याचा अधिकार राहणार नाही. अहवालानुसार, जर खेळाडूंना कोणत्याही मालिकेत खेळायचे नसेल तर त्यांना का खेळायचे नाही याचा वैध वैद्यकीय पुरावा द्यावा लागेल. बोर्डाने आधीच सर्व स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने ही प्रत्येक भारतीय खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते. तो म्हणाला की, देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देणे महत्त्वाचे आहे. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीलाही माजी क्रिकेटपटूने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता.
हेही वाचा-
रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान निवृत्ती घेणार होता, यामुळे निर्णय बदलला
विराट-रोहितपेक्षा सूर्याचा वरचढ? टी20 कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रिपोर्ट कार्ड लय भारी.!
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची फिटनेस चिंताजनक